शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी दलाल पोलिसांच्या ताब्यात

By admin | Updated: June 15, 2016 02:04 IST

बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका दलालाला मंगळवारी ताब्यात घेतले.

अकोला: बोगस जात प्रमाणपत्रप्रकरणी कोतवाली पोलिसांनी एका दलालाला मंगळवारी ताब्यात घेतले. पोलीस त्याची कसून चौकशी करीत आहेत. त्याच्या चौकशीतून महत्त्वाच्या माहितीसोबतच तहसील कार्यालयातील काही कर्मचार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. उपविभागीय अधिकार्‍याची स्वाक्षरी, शिक्का, बार कोड आणि एमआरसी क्रमांकाचा वापर करून बोगस जात प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची धक्कादायक बाब ७ जून रोजी उघडकीस आली होती. अकोल्यातील गोपाल बाबूलाल चाकर यांचा मुलगा नीळकंठ चाकर इयत्ता बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाला. पुढील उच्च शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी लागणार्‍या नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्राकरिता नीळकंठ गोपाल चाकर याचा प्रस्ताव सेतु केंद्रामार्फत अकोला उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार नॉनक्रिमिलीयर प्रमाणपत्रावर उपविभागीय अधिकार्‍यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गत ७ जून रोजी गोपाल चाकर आणि सामाजिक कार्यकर्ते पंकज जायले अकोल्याच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयात गेले होते. त्यावेळी उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनी त्यांच्या प्रस्तावाची पडताळणी केली असता, प्रस्तावासोबत जोडण्यात आलेले नीळकंठ चाकरच्या जात प्रमाणपत्रावरील बार कोड, एमआरसी क्रमांक तसेच उपविभागीय अधिकार्‍याची स्वाक्षरी आणि शिक्का बनावट असल्याचे आढळून आले. त्यामुळे नीळकंठ चाकर याचे धोबी जातीचे प्रमाणपत्र बोगस असल्याचे उपविभागीय अधिकार्‍यांनी चाकर यांना सांगितले. या प्रकाराने अकोल्यात बनावट बार कोड, उपविभागीय अधिकार्‍याची स्वाक्षरी आणि शिक्क्याचा वापर करून, चार ते पाच हजार रुपयांमध्ये बोगस जात प्रमाणपत्र देण्याचा गोरखधंदा सुरू असल्याची बाब उघडकीस आल्याने कोतवाली पोलिसांनी मंगळवारी एका जणास ताब्यात घेतले असून, पोलीस त्याची चौकशी करीत आहेत. त्या चौकशीतून काही महत्त्वाची माहिती समोर आल्यास किंवा त्याचा बनावट प्रमाणपत्र प्रकरणात समावेश दिसून आल्यास पोलीस कायदेशीर कारवाई करतील.