शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीला नरिमन पॉईंटशी थेट जोडणार; पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करू या - नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 06:49 IST

सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही.

पुणे : मला देशात पेट्रोल व डिझेलचा वापर बंद करायचा आहे. इथेनॉलचा वापर वाढायला हवा. रशियात इथेनॉलवर वाहने धावण्यास सुरुवात झाली आहे. पुण्यातही रिक्षा व दुचाकी इथेनॉलवर धावू शकते. सर्वच कार उत्पादकांना फ्लेक्स इंजिनची निर्मिती करण्यास सांगितले आहे. त्यामुळे १०० टक्के इथेनॉलवर धावणाऱ्या कारची निर्मिती भारतात होणार आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणले.

सिंहगड मार्गावर बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाच्या भूमिपूजन सोहळ्यात ते म्हणाले, “माझे वरळी-वांद्र्याशी भावनात्मक नाते आहे. या कामासाठी ६०-७० हजार कोटी लागले, हरकत नाही. पैसा कसा उभा करायचा, ही समस्या नाही. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून धोरणात्मक निर्णय झाला, तर दिल्लीला नरिमन पॉईंटशी थेट जोडून देण्याचे काम मी करून देईन,”.

दिल्ली ते मुंबई एक्स्प्रेसचे काम वेगाने सुरू आहे. आतापर्यंत ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. तेथील रस्त्यावर १७० किमी वेगाने धावणाऱ्या गाडीत बसलो होतो ; पण पोटातील पाणी हलले नाही. फक्त महाराष्ट्रातील काम राहिले असून, हा मार्ग जेएनपीटीपर्यंत नेणार आहे. वसई-विरारपासून वरळी बांद्र्यापर्यंत हा मार्ग जोडला तर नरिमन पॉईंटवरून थेट दिल्लीला १२ तासांत पोहोचता येईल, असेही ते म्हणाले.

एसटी दरात मेट्रो प्रवास- मी अशी मेट्रो शोधली आहे की, त्याच्या एक किमीसाठी केवळ १ कोटी रुपये खर्च येईल. त्याचा वेग ताशी १४० किमी प्रतितास असेल. मोफत वायफाय - टीव्ही अशा सुविधा यात असतील. - त्यामुळे पुणे ते कोल्हापूर, पुणे ते सोलापूर, पुणे ते अहमदनगर, पुणे ते लोणावळा, पुणे - बारामती या मार्गावरून मेट्रो सुरू करता येईल. त्याचा दर एसटीएवढा असेल. - मी महाराष्ट्राचा ॲम्बेसिडर म्हणून दिल्लीत काम पाहतो. संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वच विभागांच्या कामांकडे माझे लक्ष असते.  

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीroad transportरस्ते वाहतूकdelhiदिल्लीPetrolपेट्रोलDieselडिझेल