शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नगर जिल्ह्यात काँग्रेसचा वरचष्मा

By admin | Updated: February 26, 2017 01:25 IST

नगर जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल देत सर्वच पक्षांना भानावर आणले आहे. दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण गतवेळीपेक्षा त्यांच्या जागा घटल्या.

- सुधीर लंके,  अहमदनगर

नगर जिल्ह्यात मतदारांनी संमिश्र कौल देत सर्वच पक्षांना भानावर आणले आहे. दोन्ही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या, पण गतवेळीपेक्षा त्यांच्या जागा घटल्या. भाजपाला मतदारांनी एका हाताने दिले व दुसऱ्या हाताने काढले. कारण त्यांची ताकद वाढवली पण आमदारांच्या बालेकिल्यांतच त्यांना धक्का दिला. शिवसेनेच्या नेतृत्वाला तर नगरसारख्या राजकारणातील बलाढ्य जिल्ह्याचे काहीही सोयरसूतक दिसत नाही. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या पदरात तसेच माप टाकले आहे. नगर जिल्ह्यात ७२पैकी काँग्रेसने सर्वाधिक २३, तर राष्ट्रवादी १८, भाजपा १४ व शिवसेनेने ७ जागा मिळविल्या आहेत. या जिल्हा परिषदेवर आजवर सातत्याने दोन्ही काँग्रेसचा झेंडा राहिला आहे. याहीवेळी याच पक्षांना सर्वाधिक जागा असल्याने ते आघाडी करून सत्तेत येऊ शकतात.माजी आमदार शंकरराव गडाख बाहेर पडल्याने राष्ट्रवादीला नेवासात पाच जागांचा फटका बसला. ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या अकोले मतदारसंघातही भाजपाचा उदय झाला आहे. पंचायत समितीची सत्ता पिचडांना गमवावी लागणार आहे. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीचा आमदार आहे. मात्र, तेथेही पंचायत समितीत भाजपाचे बबनराव पाचपुते यांनी कमळ फुलविले. काँग्रेसचीही हीच अवस्था आहे. विखे-थोरात हे मात्तबर नेते पक्षाकडे असतानाही काँग्रेस २८वरून २३ जागांवर आली. या दोघांतील भांडणेच यास कारणीभूत आहेत. थोरात यांनी संगमनेर व विखे यांनी राहाता हे आपापले गड तेवढे राखले. जिल्ह्यात १४पैकी ६ तालुके असे आहेत जेथे जिल्हा परिषद, पंचायत समितीत काँग्रेसला भोपळाही फोडता आलेला नाही. श्रीरामपूरचे काँग्रेस आमदार भाऊसाहेब कांबळे यांनीच या वेळी पक्षाविरोधात काम केले. श्रीगोंदा, भाजपा आमदार मोनिका राजळे यांचा पाथर्डी, राम शिंदे यांचा कर्जत-जामखेड व अकोले या मतदारसंघांत भाजपा वाढली. मात्र, भाजपा आमदार शिवाजी कर्डिले व स्नेहलता कोल्हे यांच्या नगर व कोपरगाव या तालुक्यांतच पक्ष भुईसपाट झाला. नेवाशातही आमदार असताना तेथे या पक्षाला केवळ एक जागा मिळाली. ‘मिशन फोर्टी’ बासनात भाजपाकडून पालकमंत्री राम शिंदे यांनी ‘मिशन फोर्टी’ म्हणजे ४० जागा आणण्याचा नारा दिला होता. पण, त्यांचे हे मिशन ‘फोर्टीन’ म्हणजे चौदा जागांवर अडकले. अर्थात गतवेळी भाजपा सहा जागांवर होता. या वेळी त्यांच्या जागा दुपटीने वाढल्या. जिल्ह्यात एकमेव या पक्षाला वाढ मिळाली. राष्ट्रवादीच्या जागा घटवून ती जागा भाजपाने घेतली.दोन्ही काँग्रेसला एकत्रित येऊन सत्ता स्थापन करणे सोपे आहे. पण नेत्यांच्या महत्त्वाकांक्षा बघता काहीही समीकरणे आकाराला येऊ शकतात. या वेळी थोरात हे विखे यांना साथ करतील, अशी शक्यता नाही. थोरात गट अध्यक्षपदाचा दावेदार आहे. राष्ट्रवादीही गडाखांच्या आघाडीला सोबत घेऊन अध्यक्षपदासाठी दावा ठोकण्याच्या तयारीत आहे.