शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात पाच ठिकाणी काँग्रेसची सत्ता

By admin | Updated: June 28, 2016 19:42 IST

जिल्ह्यातील पाच पंचायत समितींमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून, शहादा पंचायत समिती मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे.

ऑनलाइन लोकमतनंदुरबार, दि. २८ -  जिल्ह्यातील पाच पंचायत समितींमध्ये काँग्रेसची सत्ता आली असून, शहादा पंचायत समिती मात्र राष्ट्रवादीच्या ताब्यात गेली आहे. जिल्ह्यातील सहा पंचायत समितींचे सभापती व उपसभापती पदासाठी मंगळवारी निवडणूक घेण्यात आली. नंदुरबार येथे राष्ट्रवादीचे चार सदस्य गैरहजर राहिल्याने त्याचा फायदा काँग्रेसला झाला. येथे काँग्रेसच्या रंजना नाईक दोन मतांनी निवडून आल्या. त्यांना नऊ, तर प्रतिस्पर्धी राष्ट्रवादीच्या उमेदवारास सात मते पडली.तळोदा येथे काँग्रेसच्या शांताबाई पवार, तर नवापूर येथे काँग्रेसच्या सविता गावीत बिनविरोध निवडून आल्या. अक्कलकुवा येथे काँग्रेसच्या एका उमेदवाराने बंडखोरी केल्याने सभापती व उपसभापतीपदाच्या दोन्ही बाजूंकडील उमेदवारांना समान १० मते पडली. यामुळे येथे ईश्वर चिठ्ठीचा आधार घेण्यात आला. त्यात सभापतीपदी काँग्रेसचे बिजा बावा वसावे, उपसभापतीपदी काँग्रेसचे बंडखोर इंद्रपालसिंह राणा यांची नावे निघाल्याने त्यांची निवड झाली. धडगाव येथे राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने येथे सत्ता परिवर्तन होऊन सभापतीपदी काँग्रेसचे काळूसिंग सुन्या पाडवी यांची निवड झाली. शहादा येथे काँग्रेसचे बहुमत आहे. मात्र या पक्षाच्या तीन सदस्यांनी बैठकीस दांडी मारली व सत्ता परिवर्तन होऊन राष्ट्रवादीचे दरबारसिंग पवार यांची निवड झाली.