शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसची जोरदार ‘मोर्चे’बांधणी

By admin | Updated: December 7, 2015 02:13 IST

हिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षातर्फे ८ डिसेंबरला काढण्यात येणारा मोर्चा न भुतो न भविष्यती व्हावा यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून

अतुल कुलकर्णी, नागपूरहिवाळी अधिवेशनावर काँग्रेस पक्षातर्फे ८ डिसेंबरला काढण्यात येणारा मोर्चा न भुतो न भविष्यती व्हावा यासाठी काँग्रेसने जोरदार तयारी सुरू केली असून, स्वत: प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण नागपुरात ठाण मांडून बसले आहेत. मोर्चाचे पहिले टोक टी पॉइंट आणि दुसरे टोक दीक्षाभूमी असेल एवढा मोठा मोर्चा काढण्यात येणार असल्याचा दावा काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने केला आहे.रविवारी खा. चव्हाण यांनी यासाठी बैठका घेतल्या. प्रत्येक कार्यकर्त्याला जबाबदारी ठरवून देण्यात आली आहे. कोणी किती लोक आणायचे, त्यांची व्यवस्था कशी असेल, येणाऱ्या गाड्या कोठे थांबतील, येणाऱ्यांच्या चहा-पाण्याची व्यवस्था कशी असेल इतक्या बारीक-सारीक गोष्टींचा तपशील पाहिला गेला आहे. बुटीबोरी ते नागपूर या मार्गावरील मंगल कार्यालयांमधून किती जणांची व्यवस्था होईल याचीही पाहणी पूर्ण झाली असून, सगळ्यांना जबाबदाऱ्या ठरवून दिल्या आहेत. अमरावतीपासून दिवसा, कारंजा, वाडी अशा आजूबाजूच्या ठिकाणचे अधिकाधिक लोक कसे येतील हे पाहिले जात आहे. नागपूर शहरातून मोर्चासाठी कुमक कशी आणता येईल यासाठीची मदत विरोधी गटाकडून घेतली जात आहे. प्रत्येक नेत्याने किती लोक आणायचे हे ठरवले गेले असून, नागपुरात यासाठी एक कंट्रोल रूम उघडण्यात आली आहे. त्याद्वारे किती लोक येणार याची सतत विचारणा केली जात आहे. काही भागातील शेतकरी, आम्हाला मोर्चासाठी यायचे आहे असे सांगत असल्याचा दावाही एका नेत्याने केला. सोशल मीडियाचा वापरही यासाठी केला जात आहे. उद्या सोमवारी खा. चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील व अन्य नेत्यांची, पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठेवण्यात आली आहे. त्यात मोर्चाची तयारी व अधिवेशनात कोणते विषय कसे हाताळायचे यावर भर दिला जाणार आहे.