शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसची बाजी

By admin | Updated: January 11, 2016 18:49 IST

राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कॉंग्रेसच अव्वल असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. ११ - राज्यातील नगर पंचायत निवडणुकीत सर्वाधिक १०७ जागा जिंकून काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. यामुऴे स्थानिक पातळीवर कॉंग्रेसचं वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. राज्यातील १७ नगर पंचायत निवडणुकींमध्ये २८९ पैकी कॉंग्रेसने सर्वाधिक १०७ जागा जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर राष्ट्रवादी ५८ जागा, शिवसेना ५५ जाग्यावर तर भाजप २४ जागांवर विजयी झाले आहेत.आज झालेल्या मतमोजणीत कॉंग्रेसने इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत चागंले यश मिळवल्याच चित्र आहे. राज्यातील १७ नगर पंचायतीपैकी नांदेड जिल्ह्यातील नायगाव व हिमायतनगर, उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी, नंदूरबार जिल्ह्यातील आक्राणी, नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती व कोरपना या ७ नगर पंचायत निवडणुकीमध्ये कॉंग्रेसने स्पष्ट बहुमत पटकावले.या यशाबद्दल महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी मतदारांचे आभार मानले असून, संबंधित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.खा. अशोक चव्हाण यांनी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाराष्ट्रात आज झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने सर्वाधिक १०७ जागा जिंकल्याची माहिती दिली. त्यावर कॉंग्रेस अध्यक्षांनी समाधान व्यक्त केले.