शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारविरोधात काँग्रेस आक्रमक होणार- पतंगराव कदम

By admin | Updated: November 25, 2014 23:45 IST

राजू शेट्टी म्हणजे सरकारचा ‘पार्ट’ आणि पार्सल’ : वाळू माफियांवर नियंत्रणाची जबाबदारी प्रशासनाची

सांगली : दलित हत्याकांडाचा रेंगाळलेला तपास, अवकाळी व दुष्काळी नुकसानभरपाईच्या मुद्द्यांसह सर्वसामान्यांच्या अन्य प्रश्नांवर आता सरकारविरोधात कॉँग्रेस आक्रमक होईल, असा इशारा माजी मंत्री आ. पतंगराव कदम यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला. ते म्हणाले की, अवकाळी पावसामुळे सांगली जिल्ह्यातील फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्यातील अन्य दुष्काळी भागातील शेतकऱ्यांनाही अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. तांत्रिक गोष्टीत अडवणूक करणे चुकीचे आहे. आघाडी सरकारच्या कालावधित आम्ही नुकसानभरपाईसंदर्भात स्थायी आदेश दिले होते. आताच्या सरकारनेही चार ओळीच्या स्थायी आदेशाद्वारे जिथे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे, जिथे त्यांना गरज आहे त्याठिकाणी तातडीने मदत दिली पाहिजे. राज्यातील नव्या सरकारला एक महिना झालेला आहे. त्यामुळे इतक्यात त्यांच्या प्रत्येक गोष्टीवर टीका करणे योग्य नाही. कारभार करण्यासाठी त्यांना थोडी संधी देऊन नंतर त्यावर भाष्य करणे योग्य राहील. तरीही आम्ही दुष्काळी व अवकाळी नुकसानीचा विषय तसेच जवखेडेच्या हत्याकांडाचा रेंगाळलेला तपास अशा गोष्टींवर येत्या हिवाळी अधिवेशनात आक्रमक होणार आहोत. अधिवेशनातील त्यांच्या निर्णयांची कल्पनाही आम्हाला व राज्यातील जनतेला येईल. (प्रतिनिधी)वाळूप्रश्नी प्रशासनाची जबाबदारीवाळू माफियांकडून राजापूर ग्रामस्थांवर झालेला हल्ला निषेधार्ह आहे. अशा माफियांना रोखण्याची जबाबदारी ही प्रामुख्याने जिल्हा प्रशासन व पोलिसांची आहे. त्यांनी कठोर पावले उचलली तर माफियाराजचे काहीही चालणार नाही. त्यामुळे या दोन्ही यंत्रणांनी आता सतर्क रहावे, असे मत कदम यांनी व्यक्त केले. पाण्याचा रोग जुना, पण जाणार कधी?सांगली, मिरजेतील गॅस्ट्रोच्या साथीबद्दल ते म्हणाले की, ही बाब गंभीर आहे. महापालिका आयुक्त व आरोग्य अधिकाऱ्यांशी मी चर्चा करणार आहे. दूषित पाण्यामुळेच ही साथ पसरली आहे. सांगली, मिरजेतील पाण्याचा रोग जुना असला तरी तो जाणार कधी, हा प्रश्न आहे.नेत्याचेही लक्ष नाहीइतक्या कष्टाने आम्ही महापालिकेत सत्ता मिळवली, पण कारभार कसा चाललाय, हे कळेना झाले आहे. महापालिकेचा नेता म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी दिली, तेही आता काही पहात नाहीत. त्यामुळे मी स्वत: महापालिकेच्या कारभाराचा आढावा घेईन, असे त्यांनी सांगितले.सरकार काय ते कळेलएलबीटीबाबतची भाजपची भूमिका निवडणुकीत एक होती आणि आता एक आहे. व्यापाऱ्यांनी त्यांना साथ दिली होती. आता त्यांचे सरकार नेमके कसे आहे, ते व्यापाऱ्यांना कळेल, अशी खोचक टीका कदम यांनी यावेळी केली.राजू शेट्टी म्हणजे सरकारचा ‘पार्ट’ आणि पार्सल’ऊसदराच्या प्रश्नावर पतंगराव कदम म्हणाले की, शासन जो ‘एफआरपी’ निश्चित करेल, त्याप्रमाणे कारखाने दर देण्यास बांधिल असतील. यापूर्वीही कारखानदारांची तीच भूमिका होती. राजू शेट्टी यांनी आंदोलन पुढे ढकलले असले तरी, आता ते सरकारचा पार्ट आणि पार्सल आहेत. त्यामुळे त्यांनी व सरकारने दराबाबत धोरण ठरवावे. आम्ही कारखानदार एफआरपीची अंमलबजावणी करू.