शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

गोवंश हत्याबंदीचे काँग्रेसने केले स्वागत

By admin | Updated: March 4, 2015 02:46 IST

राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे, तर राष्ट्रवादीने त्यास विरोध दर्शविला आहे. बॉलीवूडमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध : बॉलीवूड जगतातही उमटले पडसाद मुंबई : राज्यात गोवंश हत्याबंदी लागू करण्याच्या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे, तर राष्ट्रवादीने त्यास विरोध दर्शविला आहे. बॉलीवूडमध्येही याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे की, या निर्णयाचे काँग्रेस स्वागत करते; मात्र समर्थन गोळा करण्यासाठी या मुद्याचा राजकीय हत्यार म्हणून वापर करता कामा नये. या कायद्याची अंमलबजावणी पूर्णत: पारदर्शक असली पाहिजे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, भाजप या मुद्यावर जनतेची दिशाभूल करीत आहे. समाजाच्या एका घटकाला खुश करण्यासाठी राज्याचे आर्थिक नुकसान होणार आहे. या निर्णयाचा शेतकऱ्यांना सर्वांत जास्त फटका बसणार आहे. अशा प्राण्यांची काळजी घेण्यासाठी शेतकरी एका महिन्याला किमान ५,००० रुपये खर्च करतात. आता अशा प्राण्यांना जगवण्याची जबाबदारी उचलण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे. गरीब शेतकऱ्यांना यापूर्वी पर्याय उपलब्ध होता; पण आता तो नाही. बॉलीवूडमधील फरहान अख्तर, आयुष्मान खुराणा आणि रिचा चढ्ढा यांनी हा निर्णय म्हणजे मानवी हक्कांचे उल्लंघन असे म्हटले आहे. मी काय खावे, हे सरकार मला सांगू शकत नाही, असे दिग्दर्शक ओनीर यांनी टिष्ट्वट केले आहे. रिचा म्हणाली, मी शाकाहारी आहे. गोवंश हत्याबंदी करणे हे तर जातीय राजकारण झाले. सरकारने गोवंशाबरोबरच दातांवरही बंदी घालावी. आम्ही भाज्यांवर जगू. किमान त्यामुळे तरी तुम्ही राजकारणी विद्वेष पसरवणारी वक्तव्ये करणार नाहीत. - वीर दास, विनोदी अभिनेता महाराष्ट्रात महिला, दलितांपेक्षा गायी सुरक्षित आहेत. या दोहोंपेक्षा गाय झालेले बरे. - सलमान रश्दी, लेखकटिष्ट्वटरवर टिकेची झोडसो नाऊ इन महाराष्ट्रा यू कॅन हॅव अ बीफ विथ समवन बट यू कान्ट हॅव बीफ विथ समवन. - फरहान गायींना पुढील निवडणुकीत मतदानाचा अधिकार मिळाला तर आश्चर्य वाटायला नको. - शिरीष कुंदेर, दिग्दर्शक बीफ फाल बाद कमिने. - आयुष्मान खुराणा अन्नावर बंदी घालणे थांबवा आणि बँकांतून पैसे काढण्यावरही बंदी घाला. - रणवीर शौरी, अभिनेता