शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस जागावाटपावर ठाम

By admin | Updated: September 1, 2014 01:57 IST

आघाडीमध्ये विधानसभेची एकही जास्त जागा सोडू नये, असे आपले मत आहे आणि आपण ते श्रेष्ठींना कळविले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिली

यदु जोशी, मुंबईराष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीमध्ये विधानसभेची एकही जास्त जागा सोडू नये, असे आपले मत आहे आणि आपण ते श्रेष्ठींना कळविले असल्याची माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी रविवारी ‘लोकमत’ला दिली. राष्ट्रवादीला जागा वाढवून मागण्याचा अधिकार काय, असा सवालही त्यांनी केला.२००९ च्या निवडणुकीत आम्ही १७४ आणि राष्ट्रवादीने ११४ जागा लढविल्या होत्या. तेच सूत्र यावेळीही कायम राहिले पाहिजे. हे सूत्र बदलण्याचा कोणता तर्क त्यांच्याकडे आहे, असा सवाल ठाकरे यांनी केला. जागा वाढवून मागायच्या असतील तर काही आधार त्यासाठी असला पाहिजे.२००९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांच्यापेक्षा २० जागा जास्त जिंकल्या होत्या. ते ६२ तर आम्ही ८२ जागा जिंकलेल्या होत्या. तो आधार आम्ही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपात घेतला असता तर आम्हाला जागा वाढवून मिळाल्या असत्या पण त्यावेळी राष्ट्रवादीने ठाम नकार दिला होता. आता त्यांना जागा वाढवून मागण्याचा अधिकार नाही, असे माणिकराव म्हणाले. राष्ट्रवादीला जागा वाढवून देऊ नयेत, ही प्रदेश काँग्रेसची मानसिकता आहे. अर्थात जागा वाटपाचा चेंडू आता श्रेष्ठींच्या कोर्टात आहे. निर्णय दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींना घ्यायचा आहे. पण आम्ही आमच्या भूमिकेवर कायम आहोत, असे ते म्हणाले. काँग्रेसने राष्ट्रवादीला १२० जागा देवू केल्या आहेत, या वृत्ताकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींनी दिल्लीत केलेल्या चर्चेत असे काही झाल्याचे ऐकिवात आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी आम्हाला तसे अधिकृतपणे काहीही कळविलेले नाही. जागा वाटपाचा सन्मानजनक तोडगा निघाला पाहिजे, अशी भूमिका आपण आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली होती. आता एकही जागा वाढवून देवू नये, अशी भूमिका आपण घेत आहात याकडे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सन्मानजनक तोडग्याची समोरच्यांची तयारीच नसेल तर मी मांडतोय ती भूमिका योग्यच आहे.