शहरं
Join us  
Trending Stories
1
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
2
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
3
इस्राइलने इराणचा आणखी एक बडा मोहरा टिपला, चीफ ऑफ आर्मी स्टाफ अली शादमानी यांना मारल्याचा दावा  
4
हुल्लडबाजांच्या दुचाकी पुलावर आल्याने गर्दी झाली अन् होत्याचे नव्हते झाले!
5
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
6
मैत्री, न्यूड कॉल अन् धमकी...; तरुणाकडे सापडले तब्बल १३ हजार अश्लील फोटो, पोलिसांनाही बसला धक्का
7
डॉली चायवाला Starbucks चा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनणार का? समोर आलं सत्य, कंपनी म्हणाली...
8
Maharashtra Teachers: 'मी आजारी आहे किंवा...' बदलीसाठी खोटे बोलल्यास शिक्षकांच्या अंगलट येणार!
9
Sonam Raghuwanshi Video: सोनम आणि राजाच्या पुढे चालत होते तिन्ही आरोपी, नवीन व्हिडीओ व्हायरल
10
Video: ५ चेंडूत ५ बळी... IPL नंतरही दिग्वेश राठीचा जलवा कायम, केली अप्रतिम गोलंदाजी
11
Wedding Ritual: लग्नकार्य निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून 'या' पाच देवतांना ठेवली जाते लग्नपत्रिका!
12
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
13
हद्दच झाली राव! वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बुक केली रुग्णवाहिका अन्...; 'अशी' झाली पोलखोल
14
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
15
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
16
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
17
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
18
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
19
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?

काँग्रेस, राष्ट्रवादीचा रेल रोको

By admin | Updated: June 25, 2014 23:28 IST

केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज रेल रोको आंदोलन केले.

नवी मुंबई : केंद्र सरकारने केलेल्या रेल्वे भाडेवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आज रेल रोको आंदोलन केले. भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध करीत संपूर्ण भाडेवाढ रद्द करण्याची मागणी आंदोलनकत्र्यानी केली. 28 जूनर्पयत ही भाडेवाढ रद्द न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे.
राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक आणि आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली आज सकाळी ऐरोली रेल्वे स्थानकात हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात नवी मुंबई रेल्वे प्रवासी महासंघाचे प्रमुख दिनेश पारेख, महापालिकेचे सभागृह नेते अनंत सुतार, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष  जयेश कोंडे, महिला आघाडीच्या अध्यक्ष कमल पाटील तसेच पक्षाचे सर्व नगरसेवक आणि रहिवासी सहभागी झाले होते. ठाण्याहून नेरूळला जाणा:या लोकलसमोर भाडेवाढीचा निषेध करीत ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यामुळे तब्बल वीस मिनिटे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. माजी खासदार संजीव नाईक व आमदार संदीप नाईक यांनी आंदोलनकत्र्याना संबोधित केले. भाडेवाढीच्या विरोधात लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया पाहून सरकारने ही भाडेवाढ अंशत: कमी केली आहे. मात्र  प्रथम वर्गाने प्रवास करणा:या प्रवाशांच्या आणि लांब पल्ल्यांच्या प्रवासी भाडय़ात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही संपूर्ण भाडेवाढ रद्द करावी, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
वाशी स्थानकात काँग्रेसच्यावतीने रेल रोको करीत भाडेवाढीचा निषेध करण्यात आला. नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष दशरथ भगत यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. वाशी स्थानकातून अंधेरीला जाणा:या सकाळी 7.28 च्या लोकलसमोर हे ठिय्या आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने केलेली विक्रमी भाडेवाढ शंभर टक्क्यांनी कमी करावी, अशी मागणी यावेळी आंदोलनकत्र्याकडून करण्यात आली. यावेळी प्रदेश काँग्रेसच्या सचिव तथा नवी मुंबई काँग्रेसच्या सहप्रभारी छाया आजगांवकर तसेच जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश नायडू, ठाणो लोकसभा युवक अध्यक्ष निशांत भगत आणि वाशी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सुरेश शिंदे आदी उपस्थित होते.  
काँग्रेसच्या घणसोली-कोपरखैरणो कमिटीच्या वतीने घणसोली स्थानकात आंदोलन करण्यात आले.  स्थानिक नगरसेविका शोभा पाटील यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष बन्सी डोके, जिल्हा उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक दीपक पाटील, देवस्थान संस्थेचे रोहिदास पाटील, दीनानाथ पाटील, दमयंती म्हात्रे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)