शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी होणार

By admin | Updated: February 24, 2017 05:42 IST

भाजपा-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात जिथे-जिथे आवश्यकता आहे तिथे

नांदेड: भाजपा-शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राज्यात जिथे-जिथे आवश्यकता आहे तिथे आघाडी झाली पाहिजे, अशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे़ त्यासाठी काँग्रेसही सकारात्मक आहे, असे सांगत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा़अशोक चव्हाण यांनी राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आघाडी होणार असल्याचे संकेत दिले़निवडणूक निकालावर भाष्य करताना ते म्हणाले, की काही जिल्ह्यामध्ये निश्चितच आम्ही कमी पडलो आहोत़ येणाऱ्या दोन वर्षातील निवडणुका लक्षात घेता जिथे संघटनात्मक बदल करणे अपेक्षित आहे, तिथे निर्णय घेतले जातील़ आत्मपरिक्षण केले जाईल़ मुंबई महापालिकेबाबत आमची भूमिका ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’ अशीच आहे़ घडामोडी काय होतात याकडे आमचे लक्ष असून योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ. काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसला यश मिळाले आहे़ नांदेडमध्ये पूर्वीपेक्षा जागा वाढल्या आहेत़ विधान परिषद, नगरपालिका नंतर जिल्हा परिषदेमध्येही नांदेड जिल्ह्यातील जनतेने काँग्रेसला साथ दिली आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. (प्रतिनिधी)राज्यामध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीची जिथे आवश्यकता आहे, तिथे आघाडी झाली पाहिजे. याबाबत शरद पवार यांच्याशी बोलणे झाले असून दोन्ही पातळीवर सकारात्मक भूमिका आहे. - खा़ अशोक चव्हाण,प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस