शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस-राष्ट्रवादी भविष्यातही एकत्र लढण्याच्या तयारीत? प्रफुल्ल पटेल यांचे संकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 06:37 IST

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांतही आघाडी होणे स्वाभाविक असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस्ोचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी दिले. त्याचाच भाग म्हणून पालघरची जागा काँग्रेसने, तर भंडारा -गोंदियाची जागा राष्ट्रवादीने आघाडीद्वारे करून लढण्याचा निर्णय शरद पवार व राहुल गांधी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

भंडारा - पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा व विधानसभांच्या सार्वत्रिक निवडणुकांतही आघाडी होणे स्वाभाविक असल्याचे संकेत राष्ट्रवादी काँग्रेस्ोचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी दिले. त्याचाच भाग म्हणून पालघरची जागा काँग्रेसने, तर भंडारा -गोंदियाची जागा राष्ट्रवादीने आघाडीद्वारे करून लढण्याचा निर्णय शरद पवार व राहुल गांधी यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या दोन्ही लोकसभा मतदार संघांत २८ मे रोजी पोटनिवडणूक आहे.दोन्ही पोटनिवडणुका आघाडी करून लढणार असल्याचे सांगताना, खा. पटेल म्हणाले, ‘आम्ही आपापसात चर्चा करून सर्वसंमतीने उमेदवार ठरवू. उमेदवारांची घोषणा ९ मे रोजी करण्यात येणार येईल. आघाडीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार, पलुस विधानसभेची रिक्त जागा काँग्रेसला देण्याचा निर्णय घेण्यात आला. विधान परिषद निवडणुकीत सहा जागांपैकी तीन-तीन समान जागांवर काँग्रेस व राष्ट्रवादी निवडणूक लढत आहे.सरकारविषयी जनतेमध्ये नाराजीयेत्या २८ मे रोजी होणाºया निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस व राष्ट्रवादी मिळून सरकारच्या अपयशाचा आलेख जनतेसमोर मांडणार आहे. केंद्र व राज्यातील भाजपा सरकारबद्दल जनतेत प्रचंड नाराजी आहे. कोणताही वर्ग सरकारवर खूश नाही. जमीन अधिग्रहणावर सुमारे सव्वाशे कोटी रुपये खर्चून ‘भेल’ प्रकल्प आणला. हे आणि अशी अनेक उदाहरणे देऊन, सरकारच्या अपयशाचा फायदा आघाडीला मिळेल, असे पटोले व खा. प्रफुल्ल पटेल म्हणाले.दोन्ही जिल्हे भाजपामुक्त करू- नाना पटोले यांनी आपल्याला सांगितले की, वर्षाबेन प्रफुल पटेल भंडारा-गोंदियातील राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी घेत आपण दोन्ही जिल्हे भाजपमुक्त करू, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.-मात्र राष्ट्रवादीने वर्षाबेन यांची उमेदवारी जाहीर केलेली नाही. या खेपेस राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली असून आगामी लोकसभा निवडणूक आपण स्वत: लढविणार असल्याचे पटेल यांनी जाहीर केले.सुरतच्या ईव्हीएमना विरोधखा. प्रफुल्ल पटेल म्हणाले की, या पोटनिवडणुकीसाठी गुजरातच्या सुरतमधून ईव्हीए मागविण्यात आली असून, त्यास आमचा आक्षेप आहे. ईव्हीएम सुरतहून मागविण्याची आवश्यकता नव्हती. ती तेथून का आणत आहेत, याविषयी आम्हाला शंका असून, ती पुन्हा पाठविण्याची आमची मागणी आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे ती करणार आहोत.नाना पटोले यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने त्यांच्याशी झालेली मैत्री दोन्ही जिल्ह्यांतील विकासासाठी लाभदायक ठरेल, असे खा.पटेल म्हणाले. पटोले यांनीही स्वत: आपण आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारात उतरणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :ElectionनिवडणूकPraful Patelप्रफुल्ल पटेल