शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Morcha Update Live: सरकारचा दगाफटका करायचा डाव असेल तर मोठी चूक; रोहित पवारांचा इशारा
2
मराठ्यांचे वादळ मुंबईत धडकले, 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणांनी वाशी टोल नाका दणाणला
3
उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची; ढिगाऱ्यामुळे काही क्षणात अनेक लोक बेपत्ता; बचावकार्य सुरू
4
आजचे राशीभविष्य, २९ ऑगस्ट २०२५: आर्थिक लाभ, प्रवास संभवतो, गोड बोलून काम पूर्ण करू शकाल
5
Ganesh Visarjan: दीड दिवसाच्या बाप्पाला निरोप! मुंबईत दुसऱ्या दिवशी ५९,४०७ गणपती मूर्तींचे विसर्जन
6
२८०० वाहनांमधून आंदोलक मुंबईत १५ दिवसांचा शिधा घेऊन आलोय; गावनिहाय बांधव मुंबईत, गाडीत राहण्यासह जेवणाची सोय
7
गणेशमूर्ती अर्धवट सोडून पळालेल्या डोंबिवलीतील 'त्या' मूर्तिकाराला अखेर अटक
8
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्यास कोण बाजी मारणार? भाजपा की काँग्रेस? सर्व्हेतून धक्कादायक आकडेवारी समोर  
9
जरांगेंच्यां आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आझाद मैदानावर १५०० हून अधिक पोलिसांची फौज
10
मोदींच्या आईबद्दल अवमानकारक भाषा, काँग्रेस बनला शिवीगाळ करणारा पक्ष; भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांची खरमरीत टीका
11
गुरुजींसाठी नवे वेळापत्रक; गुणवत्ता वाढवा; प्रशासकीय जबाबदाऱ्याही घ्या
12
आंदोलकांची नवी मुंबईत सोय आंदोलकांना मुंबई बाजार समितीचा आधार, दोन मार्केटमध्ये सुविधा, महिलांची स्वतंत्र सोय
13
शक्तिपीठ महामार्गाच्या वर्धा-सांगली टप्प्याला अखेर राज्य शासनाची मान्यता
14
भाजपचे डॅमेज कंट्रोल; फडणवीस यांच्या समर्थनार्थ लागले बॅनर
15
अमेरिकने कितीही दम दिला, तरी उत्पादनात भारताची झेप
16
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
17
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
18
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
19
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास

मुंबई काँग्रेसमधील भांडण शिगेला

By admin | Updated: January 24, 2017 04:21 IST

महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश

अतुल कुलकर्णी / मुंबईमहापालिका निवडणुकीचे बिगुल वाजलेले असताना मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष गुरुदास कामत यांनी पक्षाचे प्रभारी मोहन प्रकाश यांच्यावर गंभीर आरोप केल्याने मुंबई काँग्रेसमधील वातावरण ढवळून निघाले आहे. मुंबई काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या वादाचे पडसाद इतरत्र पडू नयेत म्हणून मलमपट्टी करण्यासाठी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपेंद्रसिंग हुडा यांची नेमणूक करण्यात आली आहे.पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या समक्ष झालेल्या बैठकीत काही निर्णय झाले, त्यावर सगळ्यांनी सह्या केल्या. मात्र आता त्याच्याविरुद्ध कामत यांचे वागणे आहे, त्यांच्या महत्त्वाकांक्षेपायी आता पक्षच अडचणीत आलेला आहे, असे मत खासगीत पक्षातील ज्येष्ठ नेते व्यक्त करीत आहेत.निरुपम आणि मोहनप्रकाश हे जाणीवपूर्वक लोकांना पक्षाबाहेर काढत आहेत, या दोन्ही नेत्यांच्या वागणुकीमुळे कृष्णा हेगडे या माजी आमदारास पक्ष सोडावा लागला आहे. राहुल गांधी आणि अहमद पटेल उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत व्यस्त आहेत, पण त्यांनी हे तातडीने थांबवावे असे टिष्ट्वट कामत यांनी केले आहे. त्या पार्श्वभूमीवर हुडा यांची नेमणूक पक्षात चर्चेचा विषय बनली आहे. उद्या (मंगळवारी) होणाऱ्या प्रदेश काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्डात हाच विषय चर्चेचा असेल असे सांगितले जात आहे.एकीकडे नांदेडमध्ये प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी यापुढे सगळ्या निवडणुका दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन लढायचे असे सांगितले असताना मुंबईत काँग्रेसच्याच गटातटाची भांडणे संपण्याची चिन्हे नाहीत. मुंबईतही आम्हाला आघाडी करायची आहे; पण आमचीच भांडणे संपत नाहीत तेथे तुमच्याशी काय बोलणार? असा उद्विग्न सवाल खा. चव्हाण यांनी त्या बैठकीत उपस्थित केल्याचे एका नेत्याने सांगितले.गुरुदास कामत हे लोकसभेला १ लाख ८३ हजार मतांनी पराभूत झाले, नंतरच्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या एकाही विधानसभेत त्यांना यश मिळवता आले नाही. गेल्या दोन वर्षांत शिवसेना किंवा भाजपाविषयी एकही लक्षणीय आंदोलन त्यांनी केले नाही. असे असताना कामत कशाच्या आधारे पक्षातील वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे मत पक्षाचे काही नेते बोलून दाखवित आहेत.