शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
3
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
4
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
5
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
6
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
7
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
8
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
9
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
10
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
11
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
12
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
13
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
14
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
15
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
16
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
17
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
18
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
19
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
20
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग

सेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर

By admin | Updated: June 9, 2017 03:11 IST

महापौरपदाकरिता उद्या (शुक्रवार) दुपारी मनपा सभागृहात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर बसल्याचे चित्र पाहायला मिळेल

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : महानगरपालिकेच्या सातव्या महापौरपदाकरिता उद्या (शुक्रवार) दुपारी मनपा सभागृहात होणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसचा महापौर बसल्याचे चित्र पाहायला मिळेल, असे संकेत प्राप्त होत आहेत. शिवसेनेत फाटाफूट घडवून उपमहापौरपद काबीज करण्याची खेळी करण्याच्या हालचाली भाजपाने सुरूच ठेवल्या आहेत. जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक होणार आहे.सध्या मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान महिना सुरू असल्याने शुक्रवारची नमाज अदा केल्यानंतर महापौरपदाची निवडणूक होणार आहे. निवडणुकीत मतदारांनी काँग्रेस पक्षास बहुमत दिले. मात्र, शिवसेनेसोबत सत्ता वाटून घेण्याची परंपरा कायम राखत काँग्रेसने शिवसेनेला उपमहापौरपद देऊ केले आहे.महापौरपदाकरिता सात जणांनी अर्ज दाखल केले आहेत, तर उपमहापौरपदाकरिता सहा जणांनी अर्ज दाखल केले आहेत. महापौरपदाकरिता काँग्रेसचे जावेद दळवी व भाजपाच्या शाहिन सिद्दीकी यांच्यात लढत होईल. उपमहापौरपदाकरिता शिवसेनेचे मनोज काटेकर यांना कोणार्कचे नितीन पाटील आव्हान देतील, अशी चर्चा आहे.भिवंडीत भाजपाचा महापौर बसवण्याची भाषा खासदार कपिल पाटील यांनी केली होती. मात्र, काँग्रेसला भक्कम यश मिळाल्यावर पाटील यांचे मनसुबे डामाडौल झाले. शिवसेनेत फाटाफूट घडवून उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेतील दुसऱ्या गटाच्या व्यक्तीला महापौर करण्याची किंवा शिवसेनेतील एक गट व अन्य पक्ष यांची मोट बांधून कोणार्कच्या उमेदवाराला उपमहापौर करण्याच्या हालचाली पाटील यांनी सुरू केल्याची चर्चा आहे. मात्र, त्यात ते कितपत यशस्वी होतील, याबद्दल साशंकता व्यक्त केली जात आहे.