शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा जाहीरनामा : पाणीपट्टीत सूट, युजर चार्जेस करणार माफ

By admin | Updated: February 16, 2017 20:14 IST

काँग्रेसचा जाहीरनामा : पाणीपट्टीत सूट, युजर चार्जेस करणार माफ

काँग्रेसचा जाहीरनामा : पाणीपट्टीत सूट, युजर चार्जेस करणार माफसोलापूर : आॅनलाईन लोकमतपाणीपुरवठा नियमित व पुरेशा दाबाने होईपर्यंत पाणीपट्टीत ५० टक्के सूट व युजर चार्जेस पूर्णपणे माफ करण्याचे आश्वासन काँग्रेसने मनपा निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे. महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने प्रचाराचा नारळ सर्वात आधी फोडला व त्यानंतर लागलीच निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. जाहीरनाम्यात शहरातील नागरिकांना खुश करणाऱ्या सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. शहरातील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पार्किंग झोन करून अद्ययावत मार्केट उभारणे, मनपाच्या इमारती व खुल्या जागा कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेला देणार नाही, असे स्पष्ट केले आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभार करून लोकांचे कल्याण व विकासाच्या कामाला गती दिली जाईल. हद्दवाढ भागात ड्रेनेज सुविधा नसल्याने सेप्टिक टँकची सफाई ही समस्या डोकेदुखीची आहे. मनपातर्फे सेप्टिक टँकची स्वच्छता अल्पदरात करणार आहे. गरीब व्यक्तीचा अंत्यविधी विद्युत दाहिनीत मोफत केला जाईल. मनपा व शासकीय जागेवर क्रीडांगणे वसवून खेळाडूंना प्रोत्साहन दिले जाईल. आरक्षित जागेवर बागा विकसित करण्यावर भर दिला जाईल. मनपाच्या दवाखान्यांचे नूतनीकरण करून अद्ययावत सुविधा, हद्दवाढ भागात नवीन दवाखाने उभारले जातील. मनपाच्या दवाखान्यात गरीब महिलांना मोफत कॅन्सर तपासणी उपलब्ध केली जाईल. मनपाच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये ई-लर्निंग प्रशिक्षण प्रणाली राबविण्यात येईल. बंद पडलेल्या मिलच्या जागेवर केंद्र व राज्य सरकारच्या सहकार्याने घरकूल योजना राबविली जाईल. खोकेधारक व फेरीवाले यांच्या उपजीविकेचे संरक्षण करण्यासाठी हॉकर्स झोन करण्यात येतील. झोपडपट्टीधारकांना शासनाच्या परवानगीने दुमजली घर बांधण्यास परवाना मिळवून दिला जाईल. त्याचबरोबर मनपाच्या उत्पन्नवाढीसाठी मिळकतींचा सर्व्हे, विकासकामे मार्गी लागण्यासाठी दर तीन महिन्याला नगरसेवकांचा जनता दरबार, युवकांसाठी एमएस-सीआयटी प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात येतील.------------------पर्यटनाला चालना देणार बंद जकात नाक्यांच्या जागेवर पर्यटन व व्यापारी केंद्र उभारण्यात येईल. पर्यटकांसाठी ओपन बसमधून सोलापूर दर्शनाची सोय उपलब्ध केली जाईल. झोपडपट्टीधारकांना पूर्णपणे करमाफी, युवकांना प्रशासकीय सेवेत संधी मिळावी म्हणून स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांची उभारणी करून अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे काँग्रेसच्या जाहीरनाम्यात म्हटले आहे. शहर स्मार्ट करण्यावर काँग्रेसनेभर दिला आहे.