शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

...मी वारकरी आगळा! काँग्रेस नेते राहुल गांधी शेगावात खेळले पाऊली

By अनिल गवई | Updated: November 18, 2022 11:51 IST

पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’ या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत, काँग्रेस नेते तथा खा. राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भ पंढरी शेगाव येथे पाऊली खेळले.

खामगाव:

‘पर्णपाचू सावळा सावळा, विठ्ठल माझा मळा, मी वारकरी आगळा’ या अभंगाच्या ओळींचा प्रत्यय देत, काँग्रेस नेते तथा खा. राहुल गांधी शुक्रवारी सकाळी १०:४५ वाजता (वरखेड फाटा) विदर्भ पंढरी शेगाव येथे पाऊली खेळले. हजारो वारकºयांच्या उपस्थितीत टाळ-मृदूंगाच्या गजरात खा. राहुल गांधी यांनी ‘विठू नामा’चा जप केला. ‘गण गण गणांत बोतें’चा जय घोष होताच, अवघी शेगाव नगरी भक्तीमय वातावरणात न्हावून निघाली.

भारतीय संविधान वाचविण्यासोबतच लोकशाहीचे संवर्धन करण्यासाठी काँग्रेसनेते तथा माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचे नातू खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात कन्याकुमारी ते काश्मीरपर्यंत तीन हजार ५७० किलोमीटर पर्यंत भारत जोडो पद यात्रेस प्रारंभ करण्यात आला आहे.  पश्चिम विदर्भातील वाशिम, अकोला जिल्ह्यातून या पदयात्रेचे बाळापूर मार्गे  शेगावात आगमन झाले. शेगाव- बाळापूर रोडवरील वरखेड फाट्यावर उभारण्यात आलेल्या २१ फुटी परमात्मा पांडुरंग भगवान (श्री विठ्ठलाच्या )  मूर्ती भोवती एक हजार वारकºयांच्या सहभागात पाऊली खेळले. खा. राहुल गांधी श्री गजानन आणि विठ्ठल भक्तीत रममान झाल्याचा भक्तीचा ऐतिहासिक आणि अनुपम्य सोहळा उपस्थितांनी याची देही, याची डोळा हृदयाच्या गाभाºयात साठविला. ‘विठ्ठल माझा...माझा आणि मी विठ्ठलाचा’, ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ या अंभगाच्या ओळी कानावर पडताच अवघी विदर्भ पंढरी भक्तीमय वातावरणात तल्लीन झाली होती.  माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांचा नातू भक्तीत तल्लीन झाल्याचा प्रसंग पाहताच, वारकरी आणि उपस्थितांच्या डोळ्यातून आपाओप अश्रृ तरळले.

११ अभंगांवर खेळली पाऊली..!- काँग्रेस नेते ज्ञानेश्वरदादा पाटील यांच्या संकल्पनेतून वरखेड फाट्यावर पाऊलीचा सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी वारकºयांनी ११ अभंगांवर पाऊली खेळत ‘भारत जोडो पदयात्रे’त  श्रध्दा आणि भक्तीचा रंग भरला. खा. राहुल गांधी यांनीही यावेळी वारकरी, वारकरी संप्रदायाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.  त्यानंतर  वारकºयांनी खा. राहुल गांधी यांना भगवान विठ्ठल, विदर्भ पंढरीनाथ श्री गजानन महाराजांची प्रतिमा भेट देऊन यथोचित स्वागत केले.

टॅग्स :Bharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा