शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
2
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
3
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
4
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
5
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
6
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
7
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
8
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
9
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   
10
लष्कराकडून जेन-Z वर गोळीबार करण्यास नकार, जीव वाचवून राष्ट्रपती देशाबाहेर पसार, या देशात अराजक
11
वेस्ट इंडीजच्या नाकी नऊ आणणाऱ्या रवींद्र जडेजाची सचिन-सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी!
12
'आयटीआय'मध्ये मंत्र शिकवणार अन् कुंभमेळ्यात पौरोहित्य करणार; नवा अभ्यासक्रम सुरू
13
...अन् हमासने बिपिन जोशीचा मृतदेहच सोपवला, लेकाच्या सुटकेसाठी अमेरिकेचेही दार ठोठावणाऱ्या आईवर मोठा 'आघात'
14
विक्रमी वाढ, चांदी १,९५,००० रुपयांवर, इतिहासात प्रथमच एका दिवसात १५,००० रुपयांनी महागली
15
अखेर मुहूर्त सापडला! वैभव खेडेकरांचा भाजपा प्रवेश झाला, मनसेला फटका, राजकीय समीकरणे बदलणार
16
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
17
Ratnagiri: खेडमध्ये वारकरी गुरुकुलमध्येच मुलींसोबत नको ते 'कृत्य'; कोकरे महाराज आणि कदमवर गुन्हा
18
भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार; व्हिडिओ रेकॉर्ड करून ब्लॅकमेल!
19
टाटाची दिवाळीपूर्वीच शॉपिंग! जगात दबदबा वाढविण्यासाठी चिनी कंपनीच घेतली विकत
20
असाही असतो बॉस! कामाचा ताण नाही, फक्त मनसोक्त आराम; म्हणाले दिवाळीत २ किलो वजन वाढवून या

काँग्रेसमुक्त देश ही फॅसिस्ट दृष्टी

By admin | Updated: April 4, 2016 02:57 IST

काँग्रेसमुक्त भारत देश करण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला घातक आहे. हा दृष्टीकोन फॅसिस्ट विचारांचा आहे. ही परिस्थिती चिंंताजनक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली़

पुणे : काँग्रेसमुक्त भारत देश करण्याचा दृष्टीकोन लोकशाहीला घातक आहे. हा दृष्टीकोन फॅसिस्ट विचारांचा आहे. ही परिस्थिती चिंंताजनक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली़वानवडी येथील विठ्ठलराव शिवरकर सेवा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा विठ्ठलराव शिवरकर समाजभूषण पुरस्कार शरद पवार यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पवार बोलत होते. ते म्हणाले, राजकारणात अस्पृश्यता नसावी; विचारसरणीला विरोध करा, व्यक्तिमत्त्वाला नको, मात्र एक विचारसरणीच देशातून मुक्त करा हे बोलणे देशाच्या पंतप्रधानांना शोभत नाही.ज्येष्ठ विचारवंत भाई वैद्य़, भारती विद्यापीठाचे कुलपती पतंगराव कदम, पालकमंत्री गिरीष बापट, खासदार वंदना चव्हाण व अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली बहुमताने हे सरकार आले. अर्थिक सुधारणा व विकास या दिशेने देश जातोय असे दाखवतात ही एक बाजू, दुसऱ्या बाजुने आम्ही काहीही करू शकतो, देशाची सत्ता आमच्या हातात आहे; हवे ते करू, अशी प्रवृत्ती प्रभावी झाली आहे. हे असेच चालू राहिले तर उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. याचे परिणाम वेगळे होतील, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात अजून त्याचा प्रभाव जाणवत नाही. शासकीय समित्यांमध्ये विशिष्ट विचारसरणीचे लोक कसे राहतील याची काळजी घेतली जाते, असे त्यांनी सांगितले़ भाई वैद्य यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत दिलेल्या योगदानाबद्दल विठ्ठलराव शिवरकर यांचा गौरव केला व त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.