शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचा अखेर शिवसेनेला ‘हात’

By admin | Updated: March 21, 2017 03:38 IST

एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार

ठाणे : एकहाती सत्ता संपादित केल्यानंतरही आता काँग्रेसच्या हाताला टाळी देऊन शिवसेना स्थायी समितीच्या चाव्यादेखील आपल्याकडे ठेवणार असल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यावर मंगळवारअखेर शिक्कामोर्तब होणार असून, काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीचे सदस्यपद मिळणार असल्याचेही स्पष्ट होत आहे. यातून पारदर्शकतेचा डिंगोरा पिटणाऱ्या भाजपाला बाहेर ठेवण्यात शिवसेना अखेर यशस्वी झाली आहे.ठाणे महापालिकेची सत्ता प्रथमच एकहाती संपादित करून शिवसेनेने एक नवा इतिहास रचला. परंतु, तरीदेखील स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी किंबहुना स्थायीची समीकरणे जुळवून घेण्यासाठी शिवसेनेकडून नवी राजकीय समीकरणे जुळवण्याच्या हालचालींना मागील काही दिवसांपासून वेग आला होता. स्थायी समितीमध्ये १६ सदस्य निवडून जाणार आहेत. परंतु, आठ सदस्य शिवसेनेचे गेल्यास विरोधी बाकावर असलेले राष्ट्रवादी व भाजपा हे अपक्ष, एमआयएम आणि काँग्रेसला हाताशी घेऊन शिवसेनेच्या हातातोंडातील घास काढून घेण्याच्या तयारीला लागले होते. परंतु, शिवसेनेने ही चाल ओखळली आणि काँग्रेसबरोबर चर्चा सुरू केली होती. तसेच एक अपक्ष आणि एमआयएमलादेखील बरोबर घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार, आता शिवसेनेचे आठ आणि काँग्रेसचा एक अशी समीकरणे जुळवून स्थायी समितीदेखील एकहाती आपल्याकडे ठेवण्यात शिवसेनेला यश आल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसला या बदल्यात स्थायी समितीत स्थान तर मिळणार आहेच, शिवाय एक स्वीकृतदेखील त्यांच्या पदरात पडण्याची शक्यता आहे. एकूणच मागील कित्येक दिवस काँग्रेस कोणाबरोबर जाणार, या चर्चेला अखेर मंगळवारी पूर्णविराम मिळणार आहे. ते शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना देणार असल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)तीन जागा तरीही काँगे्रसला लॉटरी-ठाण्यात काँग्रेस नुकत्याच झालेल्या महापालिकेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून लढली होती. मात्र, त्यांना अपेक्षित असे यश मिळवता आलेच नाही. त्यांच्या अवघ्या तीनच जागा निवडून आल्या. त्यामुळे पालिकेत त्यांना कोणत्याही ठिकाणी स्थान मिळणार नाही, अशी शक्यताही निर्माण झाली होती. परंतु, आता स्थायी समितीच्या चाव्या आपल्याकडे ठेवण्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला गळ घातली आहे. २०१२ मध्येदेखील त्यांनी अशाच प्रकारे काँग्रेसला राष्ट्रवादीपासून वेगळे करून स्वतंत्र गटाची निर्मिती करण्यास भाग पाडले होते. च्तीच खेळी शिवसेनेने या निवडणुकीतही खेळल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीबरोबर आघाडी करणाऱ्या काँग्रेसने निवडणुकीनंतर राष्ट्रवादीशी घरोबा करण्यास टाळाटाळ केली. त्याचाच फायदा आता त्यांना होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.२३ जागा जिंकूनही भाजपाच्या हाती कटोरा स्थायीची समीकरणे जुळवण्यासाठी शिवसेना आपल्याला टाळी मागेल, अशी आशा २३ जागा जिंकणाऱ्या भाजपाला होती. परंतु, पारदर्शकतेच्या या पहारेकऱ्याला सत्तेत कोणताच वाटा न देण्याची भूमिका एकहाती सत्ता आल्यापासून शिवसेनेने घेतली होती. त्यामुळेच भाजपाबरोबर युती करण्याऐवजी त्यांनी आता काँग्रेस आणि अपक्षांना हाताशी घेऊन सत्तेच्या चाव्या आपल्याकडे खेचल्या आहेत. त्यामुळे भाजपाची स्थायीसाठी शिवसेनेसोबत युती होण्याच्या आशादेखील मावळल्या आहेत. एकूणच आता त्यांना पहारेकरीच्याच भूमिकेत पुढील पाच वर्षे काम करावे लागणार आहेत.