शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

तख्त राखण्याचे काँग्रेसपुढे कडवे आव्हान

By admin | Updated: February 10, 2017 00:51 IST

दुभंगलेला पक्ष : महाडिक गटही यंदा बाजूला; नेत्यांनी कटुता विसरून एकजूट दाखविली तरच यश

काँग्रेसजिल्हा परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच तापू लागली आहे. ग्रामीण विकासाचे महत्त्वाचे सत्ताकेंद्र असलेल्या या संस्थेवर पकड मिळविण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शड्डू ठोकले आहेत. या पक्षाचा गतनिवडणुकीतील ‘परफॉर्मन्स’ कसा होता व या निवडणुकीतील त्यांची ‘अवस्था’ काय राहील याचे पक्षनिहाय विवेचन आजपासून...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेत गेली पन्नास वर्षे असलेले ‘सत्तेचे तख्त’ राखण्याचे आव्हान या निवडणुकीत काँग्रेसपुढे आहे. गटा-तटांमध्ये व नेत्यांच्या अहंभावामध्ये संघटना दुभंगली आहे. केंद्रात व राज्यातील सत्तेची सावली भाजपने हिरावून घेतली आहे. त्यामुळे नेतृत्वापासून कार्यकर्त्यांपर्यंत सगळेच सैरभैर झाले असताना ही निवडणूक जिंकण्याचे आव्हान या पक्षापुढे आहे. त्यात भाजपने मोठे आव्हान कॉँग्रेससमोर उभे केले आहे. भाजप-जनसुराज्य युतीमुळे प्रथमच या निवडणुकीत शाहूवाडीसारख्या तालुक्यात कॉँग्रेसचा हात चिन्ह दिसणार नाही. कोल्हापूरची ‘विरोधकांचा जिल्हा’ अशी प्रतिमा असली तरी काँग्रेसच्या विचारांचा पायाही घट्ट राहिला आहे. गावातील सेवा सोसायटी, पतसंस्था, दूध संस्था एवढेच काय पिठाची गिरणही काँग्रेसच्या ताब्यात, अशी स्थिती एकेकाळी होती व आजही काही प्रमाणात ते चित्र अनेक गावांतून दिसते. साखर कारखानदारी, ‘गोकुळ’च्या सत्तेचाही काँग्रेसला आधार मिळाला. त्यामुळे काँग्रेसला उखडून काढणे आतापर्यंत कुणाला शक्य झाले नाही. काँग्रेसचा पराभव काँग्रेसच करू शकते; असे आतापर्यंतचे चित्र होते त्यात या निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपने पक्षीय आव्हान उभे केले आहे.गेल्या निवडणुकीवेळी काँग्रेसचे जिल्ह्यात सतेज पाटील व दिवंगत नेते सा. रे. पाटील हे आमदार होते. लातूरला जयवंतराव आवळे खासदार होते. त्याशिवाय राज्याची सत्ता असल्याने पक्षाची राजकारणांवर, सत्ताकारणावर मांड होती. खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यासारखा राजकीयदृष्ट्याा धिप्पाड नेताही काँग्रेससोबत होता. त्यांची काँग्रेसला कागल, राधानगरी व चंदगड तालुक्यांत मोठी मदत झाली होती. आता यातल्या बऱ्याच गोष्टी वजा झाल्या आहेत. विधानसभेला पक्षाचा एकही आमदार निवडून आला नाही. सतेज पाटील यांनी विधान परिषद जिंकल्यामुळे कार्यकर्त्यांना किमान सरकारी कामांसाठी आमदारांचे पत्र तरी मिळण्याची सोय झाली आहे. सत्ता नसल्यामुळे संघटनाही विशविशीत झाली आहे. आता ‘गोकुळ’ची कशी-बशी अर्धी सत्ता (अर्धे वाटेकरी महाडिक) सोडली तर पक्षाकडे ग्रामीण माणसांशी जोडणारे कोणतेही जिल्हास्तरीय सत्ताकेंद्र नाही. जिल्हा परिषदेत मागची पाच वर्षे एकहाती सत्ता असली तरी तिथे सांगता येईल, असे उठावदार काम झालेले नाही. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व जयवंतराव आवळे यांच्या गटांत पक्षाची विभागणी झाली आहे. एवढे असूनही या निवडणुकीत सर्वांत जास्त ५२ जागा हाच पक्ष लढवीत आहे. नेत्यांनी एकमेकांच्या पायात पाय घातले नाहीत तर लोक अजूनही ‘हाता’ला साथ देऊ शकतात.महाडिक नसल्याचाही फटकागत निवडणुकीत माजी आमदार महादेवराव महाडिक कॉँग्रेससोबत होते. त्यांचा मुलगा अमल महाडिक हा जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा दावेदार असल्याने महाडिक गटाची पूर्ण ताकद कॉँग्रेसच्या मागे होती. मात्र, या निवडणुकीत महाडिक आपल्या ताराराणी आघाडीच्या माध्यमातून भाजपसोबत आहेत. त्यामुळे महाडिकांच्या उपद्रव्यमूल्याचा फटका कॉँग्रेसला बसू शकतो. याची झलक गगनबावड्यातच दिसून आली. कॉँग्रेसच्या छावणीतील एम. जी. पाटील हे भाजपकडून लढत आहेत. असेही होऊ शकते.. यावेळेला काँग्रेस २० जागांपर्यंत गेली तरी शिवसेना व स्वाभिमानीला सोबतीला घेऊन सत्ता टिकविण्याचा प्रयत्न करू शकते. करवीर तालुक्यात अजूनही पक्षाची स्थिती चांगली आहे. गतनिवडणुकीत कागल व चंदगडने काँग्रेसला हात दिला होता. त्यातील चंदगड यावेळेलाही काँग्रेसला पाठबळ देईल. कागलला काँग्रेस अस्तित्वहीन झाली असली तरी विरोधातला गट हा भाजपचाही कट्टर विरोधक आहे. त्यामुळे तिथे भाजप सोडून अन्य कुणाच्याही जागा आल्या तरी त्या सत्ताकारणात काँग्रेससोबतच राहतील. मावळत्या सभागृहातील पक्षाचे तालुकानिहाय बळ : एकूण ३१करवीर : ०८,कागल-०५, चंदगड-०४, हातकणंगले व भुदरगड प्रत्येकी : ०३, राधानगरी व शिरोळ - प्रत्येकी २, आजरा व गगनबावडा, शाहूवाडी प्रत्येकी -०१. गडहिंग्लज व पन्हाळा तालुक्यात एकही जागा नाही.संधी कोणत्या तालुक्यातया निवडणुकीत अडचणी असल्या तरी काँग्रेसला करवीर, चंदगड, पन्हाळा आणि राधानगरीत चांगल्या जागा शक्यहातकणंगलेत कुरघोडीचे राजकारण किती पुढे जाते यावर किती जागा येणार व पडणार हे ठरणार आहे.