शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विकासाला विरोध ही काँग्रेसची विकृतता

By admin | Updated: May 24, 2015 22:50 IST

नितीन गडकरी यांची टीका : भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीची सांगता; ‘जाणता राजा’ंच्या काळात शेती विकास दर कमी कसा?

कोल्हापूर : देशातील सामान्य माणसाचा आर्थिक विकास होण्यासाठी केंद्र सरकारने विकासाचे मॉडेल तयार केले आहे; पण विकृत मानसिकतेतून कॉँग्रेस भूमी अधिग्रहण कायद्याला विरोध करीत असल्याची टीका केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी केली. स्वत:ला ‘जाणता राजा’ म्हणवणाऱ्यांच्या काळात महाराष्ट्राचा शेती विकास दर घसरला कसा, कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या सरकारने काय केले? अशी विचारणाही त्यांनी यावेळी केली. भाजपच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणी व राज्य परिषदेच्या सांगता समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे होते. गडकरी म्हणाले, कॉँग्रेसच्या ६५ वर्षांच्या राजवटीत काय मिळाले? भूकबळी, भ्रष्टाचार बोकाळला. शेतकऱ्यांनी आत्महत्या सुरू केल्या. भांडी-धुण्याच्या पावडरीचा दर गहू व ज्वारीला मिळू लागला, हे कॉँग्रेस सरकारचे धोरण होते. या सर्वांना कंटाळून जनतेने मोठ्या विश्वासाने सत्ता दिली आहे. ही सत्ता सर्वसामान्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्र्य निर्माण करण्यासाठी आहे. काहीजणांना खासदार, आमदार, मंत्री करण्यासाठीच ही सत्ता आहे, असे वाटते; पण आपली सत्ता सामाजिक व आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी आहे. हे जरी आव्हान असले तरी भाजपने ते स्वीकारले आहे. राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती व राष्ट्राचा सर्वांगीण विकास ही पक्षाची वैशिष्ट्ये असून सुशासन, विकास व डिजिटल इंडिया हे आपले भविष्य असल्याचे त्यांनी सांगितले. शरद पवार कृषिमंत्री असताना गुजरातचा कृषी विकास दर १४ टक्के, तर मध्यप्रदेशचा २३ टक्के होता, त्यावेळी महाराष्ट्राचा दर ऋण (उणे) होता असे सांगून गडकरी म्हणाले, ‘जाणत्या राजा’चे सरकार होते तर विकासदर ऋण कसा? सिंचन प्रकल्पात भ्रष्टाचार करून धरणांची कामे बंद पडल्याने महाराष्ट्राची ही अवस्था झाली; पण फडणवीस सरकारने ‘जलशिवार योजना’ सुरू केली आहे, तिची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आवाहनही त्यांनी केले.ग्रामीण भागात राहणाऱ्यांची संख्या कमी होत आहे. लोकांच्या हाताला रोजगार नसल्याने ते गावे सोडत आहेत. यासाठी रस्ते, रोजगार उपलब्ध झाले पाहिजेत; तरच ग्रामीण चेहरा बदलणार आहे. यासाठी भूमी अधिग्रहण कायद्यात थोडे बदल केले; पण विकृत मानसिकतेतून कॉँग्रेस विरोध करीत आहे. ज्यांना खाणवाटप केले ते काय अल्पभूधारक होते का, असा सवाल करीत गरिबी दूर करणे व विकासासाठी भूमी अधिग्रहण कायदा आणला असताना आता आडकाठी का आणता? अशी विचारणाही गडकरी यांनी केली.जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी प्रास्ताविक केले. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी मनोगत व्यक्त केले. पी. सतीश, शाम जाजू, मंत्री विनोद तावडे, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विद्या ठाकूर, चंद्रकांतदादा पाटील, गिरीश बापट, केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहिर, भाऊसाहेब फुंडकर यांच्यासह राज्यमंत्री, खासदार, आमदार, प्रदेश पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी) महिन्याभरात महामंडळांवरील नियुक्त्या असंख्य कार्यकर्त्यांच्या अखंड मेहनतीमुळे भाजप सरकार सत्तेत आले आहे. आपल्या सरकारकडून जनतेच्या खूप अपेक्षा आहे. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनो, काम करा. कार्यकर्त्यांचा योग्य सन्मान राखला जाईल. त्या दृष्टीने पक्षाची कार्यवाही सुरू असून महिन्याभरात विविध समित्या, महामंडळांवरील नियुक्त्यांची पूर्तता होईल, असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी येथे दिले.रावसाहेब दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारलीभारतीय जनता पक्षाचे सरकार केंद्र व राज्यात आहे. या सरकारने अनेक जनताभिमुख निर्णय घेतले असून, आपल्या पदाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून हे निर्णय तळागाळात पोहोचविणार, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी येथे केले.गडकरी म्हणाले...एक वर्षात एक लाख कोटींचे महामार्ग बांधणार रस्ते बांधकामाचा वेग दिवसाला १४ किलोमीटर अटल पेन्शन योजना, सुरक्षा विमा, जीवन ज्योती विमा योजना प्रभावी राबवा. वर्षात केवळ रस्ते विकासातून दोन टक्के जीडीपी वाढणार रोजगार व व्यवसायाभिमुख शिक्षणावर राज्याने भर द्यावा.शेतकऱ्यांनी उसाचे क्षेत्र कमी करून तेलबियांचे उत्पादन घ्यावे.ज्ञान-विज्ञान, तंत्रविज्ञानातून विकासावर भर.