शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

सरसकट कर्जमाफीची काँग्रेसची मागणी

By admin | Updated: June 25, 2017 02:21 IST

दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

विशेष प्रतिनिधी लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दीड लाख रुपये मर्यादेपर्यंतचे कर्ज माफ करण्याऐवजी सर्वच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय सरकारने घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मात्र दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीसह पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केलेल्या सूचनांचा अंतर्भाव कर्जमाफीमध्ये सरकारने केल्याचे सांगत समाधान व्यक्त केले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मात्र, सरकारने मन मोठे करून सरसकट कर्जमाफी दिली असती तर आणखी समाधान झाले असते, असे सांगितले. सरकारच्या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी होते की नाही, यावर पक्षाचे लक्ष असेल, असेही तटकरे म्हणाले. दीड लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीचा निर्णय हा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आग्रही भूमिकेमुळे झाला, असे परिवहनमंत्री आणि शिवसेनेचे नेते दिवाकर रावते यांनी पत्रकारांना सांगितले. तथापि, तटकरे यांनी काढलेल्या प्रसिद्धिपत्रकात हा निर्णय म्हणजे शुक्रवारी शरद पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात दिल्लीमध्ये झालेल्या चर्चेचे फलित असल्याचा दावा केला. शनिवारच्या घोषणेतून काही गोष्टी जर सुटल्या असतील तर सरकारसमोर पुन्हा एकदा भूमिका मांडण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे केला जाईल, असे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधानसभा, विधान परिषद, लोकसभा आणि राज्यसभा सदस्य आपले एक महिन्याचे वेतन शेतकऱ्यांसाठी देणार असल्याचे मी जाहीर करतो, असे पत्रकात म्हटले आहे.संघर्ष यात्रा अन्  संपाचे यशकाँग्रेसच्या तीनही बड्या नेत्यांनी मात्र, आधी सरसकट कर्जमाफी करण्याच्या सरकारच्या घोषणेचे काय झाले, असा सवाल केला आहे. कर्जमाफीची घोषणा हे काँग्रेस-राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्षांनी काढलेल्या संघर्ष यात्रेचे आणि त्यानंतर झालेल्या शेतकरी संपाचे फलित असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. दीड लाखाची मर्यादा न ठेवता सरसकट माफी द्या, असे त्यांनी तसेच पृथ्वीराज चव्हाण, विखे पाटील यांनी म्हटले आहे. कर्जमाफीच्या अंमलबजावणीवर आमची नजर असेल, असे ते म्हणाले. ऐतिहासिक निर्णय - खा. दानवेभाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे म्हणाले की, हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारचे अभिनंदन करतो. सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची योग्य भूमिका सरकारने घेतली आहे. राज्य सरकारवर आर्थिक बोजा आला तरी सरकार शेतीमधील भांडवली गुंतवणूक करतच राहील हे मुख्यमंत्र्यांचे आश्वासनही महत्त्वाचे आहे.पाने पुसली - रघुनाथदादाकर्जमाफीच्या निर्णयाने आम्ही समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू, असे आश्वासन या सरकारने दिले होते. सर्वच कर्जाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. ही कर्जमाफी म्हणजे गाजर दाखविण्याचा प्रकार आहे, अशी प्रतिक्रिया शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिली.