शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला आव्हान भाजपाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 01:01 IST

विदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराची सत्ता ज्यांच्यासाठी दीड तपांपासून दिवास्वप्न ठरले, त्या भाजपात ‘मोदीं’च्या प्रभावामुळे

गणेश देशमुखे / अमरावतीविदर्भाची सांस्कृतिक राजधानी असलेल्या अमरावती शहराची सत्ता ज्यांच्यासाठी दीड तपांपासून दिवास्वप्न ठरले, त्या भाजपात ‘मोदीं’च्या प्रभावामुळे अचानक विश्वास निर्माण झाला आहे. काँग्रेस विरुद्ध भाजपा असा संघर्ष या निवडणुकीत दिसणार आहे. अमरावती हे विदर्भातील नागपूरनंतरचे मोठे शहर. तपस्वींच्या वास्तव्याने इंद्रपुरी, अंबादेवीच्या पावन स्पर्शाने अंबापुरी-अंबानगरी, तसेच आता अमरावती असा इतिहास असलेल्या या नगरीने नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता सोपविली आहे. अलीकडेच पार पडलेल्या नगरपालिका आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अमरावती जिल्ह्याने भाजपाला निर्णायक कौल दिला. जिल्ह्यात ठिय्या देऊन बसलेले अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे यांची व्यूहरचना त्यासाठी महत्त्वाची ठरली होती. महापालिकेच्या विजयाची प्रमुख जबाबदारी अमरावतीचे भाजपचे आमदार सुनील देशमुख यांना सोपविण्यात आली आहे. महापालिकेत भ्रष्टाचारी नगरसेवकांची टोळी अर्थात ‘गोल्डन गँग’ कार्यरत असल्याचा आरोप करून देशमुखांनी खळबळ उडवून दिली होती. महापालिकेतील भ्रष्टाचारावर शब्दचाबकांचे फटके मारणाऱ्या देशमुखांना ‘क्लीन टीम’ निवडून आणण्याची संधी यावेळी चालून आली आहे. भूषविलेले पालकमंत्रिपद आणि काँग्रेस पक्षातील खाचखळग्यांची माहिती ही त्यांची जमेची बाजू. भाजपात तिकिटाच्या मुद्यावरून दुखावलेल्यांची संख्या मोठी आहे. अनेक ‘विनिंग कॅन्डिडेटस्’ना डावलले गेले. मेरिटऐवजी जवळीक, या सूत्रामुळे कार्यकर्त्यांत खदखदणारी ‘बदले की भावना’ भाजप किती कौशल्यपूर्णरीत्या हाताळू शकेल, हे महत्त्वाचे ठरणार आहे. शिवसेनेशी तुटलेली युती जशी अडचण वाढविणारी ठरली, तसेच शहर विकासाला गती देणारे तत्कालीन महापालिका आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांचा घेतलेला बळी, हा मुद्दाही भाजपला जड जाणारा आहे. सत्तेशी जवळचे नाते राखणाऱ्या काँग्रेसला यावेळी घाम गाळावा लागत आहे. महापालिकेचे मावळते उपमहापौर काँग्रेसचे शेख जफर हे कुख्यात गुंड. अनेक महिने उपमहापौर कार्यालयाला कुलूप आणि जफर फरार, अशी स्थिती होती; तरीही त्यांचे पद काँग्रेसने कायम ठेवले. राज्यात सत्ता भाजपाची आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर जफर यांच्या तडिपारीचा प्रस्ताव तयार झाला आहे. तडीपार कारवाईची ही तिसरी वेळ होय. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली ती कधी काळी शरद पवार यांचे खासे विश्वासू असलेले संजय खोडके यांनी! पवारांनी खोडकेंशी ऐनवेळी खेळी खेळली. खोडके त्यामुळे दोन वर्षांपासून काँग्रेसवासी झाले आहेत. राष्ट्रवादी अस्तित्वशून्य झाली आहे.