शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
2
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
3
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
4
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
5
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
6
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
7
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
8
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
9
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
10
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
11
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
12
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
13
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
14
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
15
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"
16
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
17
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
18
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
19
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
20
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  

दुष्काळावरून काँग्रेसचा हल्लाबोल!

By admin | Updated: December 1, 2014 02:06 IST

राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही.

औरंगाबाद : राज्यातील शेतकरी दुष्काळामुळे अडचणीत सापडला असताना सरकारला मात्र दुष्काळ दिसत नाही. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागपुरात ८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर पहिल्याच दिवशी लाखो शेतकऱ्यांचा मोर्चा काढणार आहे, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी येथे दुष्काळ परिषदेत दिली.राज्यभरात १ व २ डिसेंबरला तालुका पातळीवर काँगे्रसचे कार्यकर्ते निदर्शने करतील, तर ४ डिसेंबरला जिल्हा पातळीवर रास्ता रोको केला जाईल. यंदा मान्सूनमध्ये अपुरा पाऊस तर नोव्हेंबरमध्ये अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सोयाबीनचे पीकच आले नाही. कापसाचेही उत्पादन अत्यल्प आहे. त्यालाही योग्य भाव मिळत नाही. विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतो आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र पाण्याचा दुष्काळ जाणवत नसल्याचे औरंगाबादमध्ये म्हणाले. शिवाय सरकार म्हणे उपग्रहाच्या माध्यमातून माहिती घेत आहे. मग प्रशासन कशासाठी आहे, असा प्रश्न ठाकरे यांनी केला. काँग्रेस सरकारने तीन वर्षांमध्ये शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांच्या मदतीचे पॅकेज दिले होते. शेतकरी होरपळून निघालेला असताना केंद्र सरकारचे पाहणी पथक सुद्धा अद्याप आलेले नाही, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)