शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे कार्यकर्ते राष्ट्रवादीवर नाराज

By admin | Updated: September 1, 2014 04:13 IST

राष्ट्रवादीने ज्यादा जागांची मागणी करीत काँग्रेसची कोंडी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याची भाषा करीत बॉम्बगोळा टाकला आहे.

मुंबई : विधानसभा निवडणुकीचा फड रंगू लागला असताना राष्ट्रवादीने ज्यादा जागांची मागणी करीत काँग्रेसची कोंडी केल्यानंतर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीवर काँग्रेसचे कार्यकर्ते नाराज असल्याची भाषा करीत बॉम्बगोळा टाकला आहे.मी स्वत: आघाडी तोडण्याच्या विरोधात आहे; मात्र राष्ट्रवादीची देहबोली काँग्रेसविरोधीच राहिली आहे असे आमच्या कार्यकर्त्यांना वाटते, असे ते पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत म्हणाले. गेल्या १५ वर्षांपासून राष्ट्रवादीसोबत आमची युती असून, ती तुटावी असे आम्हाला वाटत नाही. मात्र काँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या सरकारमधील आणि निवडणुकीच्या काळातील भूमिकेवर नाराज आहेत. काँग्रेसच्या उमेदवाराला पाडण्यासाठी अपक्ष उमेदवार उभे करण्याचे किंवा आडून विरोधकांना मदत करण्याचे राजकारण या पक्षाने खेळले आहे, अशी आमच्या पक्षकार्यकर्त्यांची भावना आहे, या शब्दांत त्यांनी जाहीरपणे नाराजी बोलून दाखविली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा चांगली कामगिरी केल्याच्या आधारावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २८८ पैकी १४४ जागांची मागणी करीत जागावाटपाचा तिढा निर्माण केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी ही स्पष्टोक्ती केली. मोदींनी गुजरात मॉडेलचा गवगवा केला. पण प्रत्यक्षात महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या राजवटीत गुजरातपेक्षा जास्त विकास झाल्याचा दावा चव्हाण यांनी केला आहे. याच कामगिरीच्या बळावर विधानसभा निवडणुकीत भरीव कामगिरी करीत लोकसभेतील पराभवाची पुनरावृत्ती टाळता येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)