शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

‘सासर-माहेर’वरून संभ्रम : मतदान यंत्रावर नाव बदलले; महिला उमेदवार हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2017 19:22 IST

निवडणूकीची रणधुमाळी अंतीम टप्प्यात पोहचली आहे.

नाशिक / आॅनलाईन लोकमत : नाशिक : निवडणूकीची रणधुमाळी अंतीम टप्प्यात पोहचली आहे. मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना प्रभाग क्रमांक १५मधील एका अपक्ष उमेदवाराला धडकी भरली आहे. कारण त्या महिला उमेदवाराला निवडणूक आयोगाने ज्या नावाने ‘निशाणी’ दिली त्या नावातच मतदान यंत्रावर बदल झाला आहे. त्यामुळे या उमेदवाराच्या प्रचारावर पाणी फिरण्याची भीती व्यक्त होत आहे.प्रभाग क्रमांक १५ ब सर्वसाधारण महिला गटातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या परदेशी सिमा भास्कर यांच्या मतदान यंत्रावर परदेशी सिमा राजेंद्र असा उल्लेख असल्याची बाब त्यांच्या लक्षात आली. यानंतर परदेशी यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत खुलासा के ला. यावेळी त्या म्हणाल्या, निवडणूकीचा उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान कार्डावरील उमेदवाराचे नाव व अर्जावरील नावात फरक असल्यामुळे सदर अर्ज स्विकारला नाही. मतदान कार्डावर जे नाव आहे त्याच नावाने अर्ज भरावा लागेल असे सांगितले. त्यानंतर परदेशी यांनी नावात दुरूस्ती करुन कार्डावरील नावाप्रमाणे परदेशी सिमा भास्कर असा नामोल्लेख करत उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला. ८ फेबु्रवारी रोजी उमेदवारांना निशाणी वाटप करण्यात आली तेव्हा देखील परदेशी यांना ज्या नावाने दुरूस्ती करुन अर्ज भरून दिला त्याच नावाने ‘गॅस सिलिंडर’ ही निशाणी देण्यात आली होती. यामुळे त्यांनी प्रचारामध्येदेखील त्याच नावाने प्रचार केला; मात्र मतदान अवघ्या तीन दिवसांवर आले असताना अचानकपणे या प्रभागातील १५ बच्या मतदान यंत्रावर परदेशी यांचे नाव जुन्या पध्दतीनेच छापून आल्याने त्यांना धडकी भरली आहे.