शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

संभ्रम, गैरसोय आणि मनस्ताप!

By admin | Updated: November 10, 2016 02:05 IST

दैनंदिन व्यवहारातून ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्याने पुणे जिल्ह्यातील सामान्यांचे आज रोजच्या साध्या साध्या गोष्टींत खूप हाल झाले. सकाळपासून संभ्रम

पुणे : दैनंदिन व्यवहारातून ५०० आणि १००० च्या नोटा बंद झाल्याने पुणे जिल्ह्यातील सामान्यांचे आज रोजच्या साध्या साध्या गोष्टींत खूप हाल झाले. सकाळपासून संभ्रम, गैरसोयी आणि मनस्ताप अशा अवस्थांतून लोकांना जावे लागले. आज बँका आणि एटीएम बंद असल्याने लोकांचे हाल झाले. बहुतेकांनी आदल्या रात्री एटीएममधून पैसे काढून ठेवलेले होते परंतु त्या नोटा ५००-१०००च्याच असल्याने दैनंदिन व्यवहारात त्या नोटांना सगळीकडे नकारच मिळत होता. सुरुवात झाली ती पेट्रोलपंपापासूनच. पेट्रोलपंपावर तरी सुट्टे मिळतील या आशेपायी लोकांनी सकाळपासूनच भल्यामोठ्या रांगा लावल्या. पण हुशार पंपचालकांनी सकाळपासूनच ५००-१०००च्या नोटा स्वीकारणार नाही याच्या प्रिंटआऊटच लावून टाकल्या होत्या. भरायचे तर ५०० चे भरा १०० चे सुट्टे मिळणार नाहीत असा पवित्रा बहुतांश चालकांनी घेतलेला होता. त्यामुळे काही ठिकाणी चालकांशी ग्रामस्थांची हुज्जत होण्याचे प्रकारही घडले. रोजची भाजी, हॉटेलातील नाश्ता, बाहेरचे जेवण, साध्या साध्या गोष्टींची खरेदी, किराणासामान घेणे या सगळ््या गोष्टींना मर्यादा आल्या होत्या आणि १०० च्या नोटा मर्यादीत असल्याने लोकांचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांनाही याचा चांगलाच फटका बसला. मंचर, चाकण, इंदापूर, बारामती, पुरंदर तालुक्यातून जाणाऱ्या प्रवाशांना सुट््या पैशांच्या अडचणीने आणि पाचशे-हजारच्या नकाराने हैराण करून सोडले. रिक्षाने जायचे म्हटले तरीही सुट्ट्याची अडचण आ वासून उभी होतीच.सराफ बाजारामध्ये सराफी व्यावसायिकांनी हुशारीने आज दुकाने बंद ठेवली अथवा फक्त सोने खरेदी सुरू ठेवली. सोन्याचे ३९ हजारांवर भाव गेल्याने सराफांची मात्र 'चांदी' झाल्याचे चित्र होते. पुणे नगर, पुणे सोलापूर व पुणे सातारा महामार्गावरील ढाबे, हॉटेल्स या ठिकाणी देखील ग्रामीण भागातील लोकांना पुष्कळ त्रास सहन करावा लागला. लांबचा प्रवास करणाऱ्या ट्रकचालकांनाही ढाब्यावर जेवण मिळणे अवघड होऊन बसले. सरदवाडी सारख्या कायम 'हाऊसफुल्ल' असणाऱ्या हॉटेलातही आज टेबले रिकामी दिसत होती. बाजारपेठांमध्ये शुकशुकाट़़!शिक्रापूर : तालुक्यातील मोठ्या बाजारपेठा असलेल्या शिक्रापूर, पाबळ, तळेगाव, सणसवाडी, कोरेगाव आदी भागांत आज दिवसभर ५०० व १००० च्या नोटा चलनात आणण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दुकानदारांना हैराण केले. तर, दुकानदारांकडे देखील सुट्टे पैसे नसल्याने अनेक ठिकाणी व्यवहार ठप्प झाले.किराणा दुकानदार, कापड, जनरल स्टोअर्स, हॉटेल व्यावसायिक, त्याचबरोबर सोनार, पीठ गिरणी, मेडिकल स्टोअर्स, हॉस्पिटल त्याचबरोबर आठवडे बाजार व छोटे-मोठे दुकानदारांना आज दिवसभार ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणावर ५०० व १००० च्या नोटा व्यवहारात आल्या. किरकोळ दुकानदारांना याचा मोठा फटका बसला असून, मालाची देवघेव करताना रोजच्या उलाढालीत ७० टक्के फरक पडला. अनेक दुकानदारांनी सुट्या पैशाअभावी ग्रहकांना माल दिला नाही. त्यामुळे ग्राहकांचीदेखील मोठ्या प्रमाणावर हेळसांड झाली. या भागातील पेट्रोलपंपावर मोठ्या प्रमाणावर गर्दी सकाळपासूनच सुरू होती. यात ९० टक्के ग्राहकांनी ५०० ते १००० च्या नोटा देणे पसंत केले. आपल्या जवळील नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न केला. त्यातच दिवसभर बँक व्यवहार बंद असल्याने छोटे-मोठे व्यवहार करताना सर्वसामान्य नागरिकांची धांदल उडाली. शिरूर तालुक्यातील औद्योगीकरणामुळे दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची उलाढाल या भागात होत असते. त्यात मोठ्या प्रमाणावर ५०० व १००० च्या नोटा चलनात येत असतात. येत्या आठवडाभरात ‘नोटा बंदचा’ मोठा फटका या भागात होणार असल्याचे अनेक व्यापाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. प्रतीक्षा बँक सुरू होण्याचीअनेकांना ५०० ते १००० च्या नोटा बंद झाल्या असल्याने आपल्या जवळील असलेल्या नोटा बाजारात वटवण्यासाठी विनाकारण धावपळ केलीतर या भागातील सुमारे ३० टक्के श्रीमंत लोकांनी बँक व्यवहार सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर उलाढाल या भागात होणार आहेत़यासाठीच आतापासूनच अनेकांनी आपले मित्र, नातेवाईक व काही एजंट शोधून जवळील ५०० व १००० च्या नोटा वटवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.