शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

होली क्रॉस शाळेत प्रवेशावरून गोंधळ

By admin | Updated: June 5, 2014 23:03 IST

प्रवेश यादीतून २५ नावे वगळून नवीन यादी प्रसिध्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दुसर्‍या दिवशीही शाळेसमोर निदर्शने केली.

ठाणे - राबोडीतील होली क्रॉस या खाजगी शाळेच्या प्रशासनाने आधी जाहीर केलेल्या ज्युनिअर के.जी. प्रवेश यादीतून २५ नावे वगळून नवीन यादी प्रसिध्द केल्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी दुसर्‍या दिवशीही शाळेसमोर निदर्शने केली. अखेर या प्रकरणाची ठाणे महापालिका शिक्षण विभागाने दखल घेतली असून या संदर्भात शुक्रवारी शाळा व्यवस्थानाबरोबर बैठक घेण्याचे निश्चित केले आहे. तसेच शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्याचे आदेशही शिक्षणाधिकारी गणपत मोरे यांनी दिले आहेत. राबोडी येथील ही शाळा केवळ मुलींसाठी असून या शाळेने ज्युनिअर के. जी. प्रवेश प्रक्रिया सुरु केली होती. पालकांनी प्रवेशाचे अर्ज भरुन सादर केल्यानंतर शाळा प्रशासनाने २९ मार्च रोजी पात्र विद्यार्थ्यांच्या नावाची यादी जाहीर जाहीर केली होती. मात्र त्यानंतर शाळा प्रशासनाने नोटीस लावून ही यादी रद्द केल्याचे जाहीर केले होते. तसेच ३ जून रोजी पालक नवीन यादी जाहीर होईल, असे स्पष्ट केले होते. त्यावेळी आधीच्या यादीतील २५ जणांची नावे नवीन यादीत नसल्याचे पालकांच्या निदर्शनास आले. या संदर्भात पालकांनी शाळा प्रशासनास जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याकडून त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे पालकांनी या संदर्भात महापालिकेच्या शिक्षण विभागाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत शिक्षणाधिकारी मोरे यांनी गुरुवारी शाळेला भेट दिली. मात्र त्यांना तेथे कोणीही भेटले नाही. त्यामुळे त्यांनी शुक्रवारी शाळा प्रशासनासोबत बैठक बोलावली आहे. तर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ही बैठक बोलावल्याची माहिती त्यांनी दिली. यामध्ये नवीन यादी निवडीचे निकष काय आहेत, याविषयी शाळा व्यवस्थापनाकडे खुलासा घेण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिल्याचेही त्यांनी सांगितले.