शहरं
Join us  
Trending Stories
1
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
2
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
3
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
4
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
5
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
6
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
7
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
8
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
9
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
10
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
11
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
12
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
13
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
14
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
15
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
16
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
17
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
18
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
19
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
20
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन

‘कॅशलेस’बाबतच्या अज्ञानामुळे गोंधळ

By admin | Updated: January 1, 2017 02:21 IST

ग्रामीण भागातील डिजिटल सुविधा विचारात घेऊन, कॅशलेसचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवावा, अशी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची भावना आहे. कॅशलेस व्यवहार कसा करावा

कोल्हापूर : ग्रामीण भागातील डिजिटल सुविधा विचारात घेऊन, कॅशलेसचा निर्णय टप्प्याटप्प्याने राबवावा, अशी जिल्ह्यातील ग्रामीण जनतेची भावना आहे. कॅशलेस व्यवहार कसा करावा, याबाबत सामान्य माणसाला ज्ञान नसल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. यासाठी या प्रशिक्षणही मिळावे, अशीही अपेक्षा ग्रामीण भागात व्यक्त करण्यात येत आहे. जिल्हातील म्हारूळ या गावातील नागरिकांची प्रतिक्रियाही यापेक्षा वेगळी नाही. साक्षरतेचे प्रमाण कमी आणि सुविधांचा अभाव, यामुळे हे गाव पूर्णत: कॅशलेस करण्यात अडचणी येत आहेत.गाव : म्हारूळ तालुका : करवीर, जिल्हा : कोल्हापूर.जिल्ह्याच्या ठिकाणापासून अंतर : २० किलोमीटर.बॅँका, पतसंस्थांची संख्या : एकही नाही.पोस्ट आॅफिस : नाही.एटीएम केंद्र : नाही.वाहतूक सुविधा : एसटी व केएमटीबस इंटरनेट सुविधा : ग्रामपंचायतीमध्ये कनेक्टिव्हिटी : अधूनमधून तुटते.कॅशलेस व डिजिटल व्यवहार : महाविद्यालयीन तरुण मोबाइलवरून किरकोळ प्रमाणात डिजिटल व्यवहार करतात.दोन महिन्यांत कॅशलेस व डिजिटल व्यवहार वाढले का? : संस्थांनी कॅशलेसबाबत पुढाकार घेतला, पण सुविधा नसल्याने अडचणी येत आहेत.वीजपुरवठा : घरगुती वीजपुरवठा अखंडित.350स्मार्ट फोनधारक 65.5% साक्षरतेचे प्रमाणभारत डिजिटलदृष्ट्या साक्षर व्हायलाच हवा, यासाठी आमचा तरुणांचा प्रयत्न आहे. सध्या आम्ही मोबाइलच्या माध्यमातून याची थोडी सुरुवात केली आहे, पण संपूर्ण कॅशलेस व्यवहार होण्यासाठी प्रशिक्षणाची गरज आहे. - अभिजित पाटील चलन तुटवड्यामुळे शेतकऱ्यांबरोबर संस्थांची कोंडी झाली आहे. खताच्या दुकानात गेलो तर उधारी मिळत नाही. कॅशलेस व्यवहार करावा, पण तशा सुविधा व प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. - पांडुरंग चौगले, उपाध्यक्ष, भैरवनाथ विकास संस्था. कॅशलेसच्या व्यवहाराबाबत आम्हाला भीती वाटते. त्याचबरोबर भविष्यात याचा मोबदला द्यावा लागला, तर तो परवडणारा नाही. याबाबत खात्री देऊन तशा सुविधा द्याव्यात.- भरत चौगले, शेतकरीचलन तुटवड्यामुळे व्यवसाय निम्म्यावर आला आहे. लोकांकडे पैसेच नसतील, तर ते आमच्या दुकानात कशाला येणार? कॅशलेस करण्यास हरकत नाही, पण याबाबत सुविधा व प्रशिक्षण देण्याआधीच निर्णय घेतल्याने त्रास होत आहे. - मनोेहर भाट, हॉटेल व्यावसायिककिरकोळ व्यावसायिकांची मोठी कुचंबणा सुरू आहे. एक रुपयापासून शंभर रुपयांपर्यंत आमच्याकडे ग्राहक येतात. पारदर्शक व्यवहारासाठी कॅशलेस गरजेचे आहे, पण याबाबत कोणतेही प्रशिक्षण न देता एकदम नाक दाबणे योग्य नाही. - बाजीराव पोवार, किराणा माल व्यावसायिक