शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
6
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
8
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
9
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
10
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
11
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
12
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
13
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
14
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
15
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
16
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
17
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
18
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
19
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
20
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा

मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने संभ्रम

By admin | Updated: October 31, 2016 06:55 IST

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली

मुंबई : बहुचर्चित शीना बोरा हत्येप्रकरणी तपासात मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. हत्येच्या तपासामध्ये तत्कालिन पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी अधिक स्वारस्थ दाखविल्याने त्यांची आयुक्तपदावरुन पदोन्नतीवर उचलबांगडी केल्याचे अप्रत्यक्षपणे स्पष्ट केले असले तरी, मारिया यांच्या बदलीनंतरही हत्येचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु राहणार असल्याचे राज्य सरकारने त्यावेळी का जाहीर केले होते? त्यामागील नेमके कारण काय? अशी चर्चा पोलीस वर्तुळात सुरु आहे.सरकारची त्यावेळेच्या व आत्ताच्या भूमिकेतील बदलामागील नेमके कारण काय, राजकीय सोयीनुसार त्यांच्याकडून बदल केला जात आहे, त्याचा फटका अधिकाऱ्यांच्या मनोबलावर होत असल्याची प्रतिक्रिया अधिकाऱ्यांकडून वर्तविली जात आहे.मुख्यमंत्री फडणवीस यांनी शनिवारी शीना बोरा हत्येच्या तपासाच्या अनुषंगाने बोलताना पत्रकारांशी बोलताना या हत्येमागे पीटर मुखर्जी याचा सहभाग नसल्याचे माहिती मुंबई पोलिसांनी त्यावेळी आपल्याला दिली होती, असे सांगितले. त्यांनी स्पष्टपणे कोणत्याही अधिकाऱ्याचे नाव घेतले नसलेतरी ते अप्रत्यक्षपणे मारिया यांना उद्देशून होते. पीटरला सूट दिल्याने त्यांची होमगार्डला उचलबांगडी केली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र ८ सप्टेंबर २०१५ रोजी मारिया यांना अकस्मितपणे बढती देताना त्यांच्या जागी अहमद जावेद यांची नियुक्ती केल्यानंतर गृहसचिव के. पी. बक्षी यांनी पत्रकारांशी बोलताना वेगळीच भूमिका मांडली होती. सणासुदीचे दिवस असल्याने त्यापूर्वी जावेद यांना पुरेसा अवधी मिळावा, यासाठी २२ दिवसाआधी मारिया यांचे प्रमोशन करण्यात आले आहे. मात्र शीना बोरा हत्येचा तपास यापुढेही त्यांच्याच मार्गदर्शनाखाली सुरु राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. परंतु, नाराज झालेल्या मारिया यांनी त्याला नकार दिला. त्यानंतर तब्बल १२ दिवसांनी बोरा हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला होता. पुढे याप्रकरणी पीटर मुखर्जीला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)ही वस्तुस्थिती असताना मुख्यमंत्र्यांनी शनिवारी केलेल्या वक्तव्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरु आहे. मारिया हे पीटरला पाठीशी घालित होते तर ‘होमगार्ड’मध्ये बदली केल्यानंतरही याप्रकरणाचा तपास त्यांच्या मार्गदर्शनाखालीच सुरु ठेवण्याची भूमिका तेव्हा राज्य सरकारने का घेतली होती, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. (प्रतिनिधी)>डीजी पदासाठी डावललेपोलीस महासंचालक सतीश माथूर यांच्यानंतर सध्या राज्यातील सर्वांत ज्येष्ठ आयपीएस अधिकारी असलेले राकेश मारिया गेल्या वर्षभरापासून तुलनेत कमी दर्जाच्या होमगार्डच्या महासमादेशकपदावर कार्यरत आहेत. ‘एसीबी’च्या डीजी पदासाठी ते पात्र असतानाही राज्य सरकारने त्यांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, सीबीआयने शीना बोरा हत्याकांड प्रकरणाच्या तपासाच्या अनुषंगाने गुरुवारी मारिया यांच्यासह सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती, उपायुक्त सत्यनारायण चौधरी यांच्याकडे चौकशी केली होती.