शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र बदलल्याने गोंधळ

By admin | Updated: March 2, 2017 02:18 IST

मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली

मनोहर कुंभेजकर,मुंबई- मंगळवारपासून सुरू झालेल्या बारावीच्या परीक्षांची केंद्रे अचानक बदलल्याने अनेक परीक्षार्थींवर आयत्या वेळी धावाधाव करण्याची वेळ आली. अनेक विद्यार्थ्यांना केंद्र शोधण्यासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका मुंबईतील अनेक विद्यार्थ्यांना बसला. आधीच प्रचंड वाहतूककोंडीने जेरीस आलेले असताना केंद्र बदलाने मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे यात अध्ययन अक्षम आणि अपंग विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती. निशिल घोडके या वाणिज्य शाखेतील सेरेब्रल पाल्सीग्रस्त, व्हीलचेअरवर असणाऱ्या व लेखनिकाच्या मदतीने पेपर सोडविणाऱ्या विद्यार्थ्याचेही हाल झाले. या विद्यार्थ्याचे एम. के. संघवी कनिष्ठ महाविद्यालय हे परीक्षा केंद्र आयत्यावेळी बदलून त्याला जुहू येथील कै. अनंत जनार्दन म्हात्रे कनिष्ठ महाविद्यालय येथे पाठवण्यात आले. त्या महाविद्यालयात लिफ्टची सोय नसल्याने व निशिल जिने चढण्यास असमर्थ असल्याने त्याचे पालक कोंडीत सापडले. पालकांनी महाविद्यालय प्रशासनाकडे त्याच्यासाठी आणि त्याच्यासारख्या अन्य विशेष विद्यार्थ्यांची तळमजल्यावर परीक्षा घेण्याची सोय करा, अशी विनंती केली. परंतु, किरकोळ कारणे सांगत ही विनंती अमान्य करण्यात आली. त्यानंतर प्रचंड कष्ट घेऊन निशिलला चार जिने चढवून दुसऱ्या मजल्यावरील वर्गात जावे लागले. महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि व सदर महाविद्यालय प्रशासनाच्या अपंग विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था व असहिष्णुता लाजिरवाणी असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले. शासनाच्या अपंगाना समान व सन्मानजनक वागणूक देण्याच्या व त्यांना मूळ प्रवाहात सामावून घेण्याच्या धोरणाला हा प्रकार हरताळ फासणारा असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. >इतरांनाही त्रासनिशिलचे पालक जागरूक असल्याने हा प्रकार समोर आला. अनेक परीक्षार्थींचे असे हाल होत आहेत, पण ते समोर येत नाहीत, असे मतही काही शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. अपंग विद्यार्थ्यांप्रती असलेली अनास्था व असहिष्णुता लाजिरवाणी असल्याचे पालकांनी या वेळी बोलून दाखविले.