शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

‘नीट’मुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

By admin | Updated: May 17, 2016 02:38 IST

‘सीईटी’ऐवजी ‘नीट’ परीक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत

खडकी : ‘सीईटी’ऐवजी ‘नीट’ परीक्षा देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. नीट परीक्षेसंदर्भातील माहिती आणि मार्गदर्शन कोठेच मिळत नसल्याने राज्य शासनाने विद्यार्थ्यांची फसवणूक केल्याचा आरोप होत आहे. या संदर्भात त्वरित उपाययोजना करण्याची मागणी वंदे मातरम् संघटनेने केली आहे.सीबीएसई अभ्यासक्रमावर आधारित नीट परीक्षा २४ जुलैला घेण्यात येणार आहे. केवळ दोन महिन्यांत राज्याचे विद्यार्थी बदललेल्या अभ्यासक्रमास कसे सामोरे जाणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला आहे. याचा फायदा घेत खासगी शिकवणी वर्गांनी दोन महिन्यांच्या विशेष वर्गासाठी भरमसाट शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. यावर सरकारचा कोणताच अंकुश नाही. ऐपत असणारे खासगी वर्ग लावत आहेत. मात्र, सामान्य व ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे.सीबीएसई अभ्यासक्रमाचा राज्याचे विद्यार्थी धसका घेतात. तो अभ्यासक्रम दोन महिन्यांत पूर्ण करून घेण्याचे आश्वासन जाहिरातबाजी करून खासगी शिकवणीवर्गाकडून देण्यात येत आहे. यासाठी भरमसाट शुल्क आकारले जात आहे. त्यावर मर्यादा घालावी. पुढील काळात प्रवेश परीक्षा व स्पर्धा परीक्षा सीबीएसई पॅटर्नवर घेतल्या जाणार असल्याने एसएससी व एचएससी बोर्डाचा उपयोग केवळ मर्यादित शाखेच्या नोकरीसाठी राहणार आहे. उच्च शिक्षणापासून राज्याचे विद्यार्थी वंचित राहण्याचा धोका आहे. त्यामुळे आठवीपासूनच सीबीएसई अभ्यासक्रमाचा समावेश करून बारावीपर्यंत देशभरात समान अभ्यासक्रम राबवावा. खासगी वर्गाकडे कल वाढल्याने कनिष्ठ महाविद्यालय रिकामे असतात. ही मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न केले जावेत, अशी मागणी संघटनेचे प्रांताध्यक्ष विकास हांडे, कार्याध्यक्ष राजेश शर्मा, सचिव राजेंद्र जगताप, शिरीष रोच यांनी केली आहे. (वार्ताहर)