शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल प्रवेशावरून गोंधळात गोंधळ

By admin | Updated: August 23, 2016 05:40 IST

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्ता यादीनुसार होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे.

पुणे : अभिमत विद्यापीठांशी सलंग्न वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश ‘नीट’च्या गुणवत्ता यादीनुसार होणार असल्याचे राज्य शासनाने जाहीर केले आहे. मात्र, सध्या विद्यार्थ्यांना खासगी आणि अभिमतसाठी स्वतंत्रपणे अर्ज भरावा लागत असल्याने दोन्हीसाठी गुणवत्ता यादी एकच असेल की स्वतंत्र, यावरून विद्यार्थी व पालकांमध्ये गोंधळ आहे. खासगी संस्थांत प्रवेशाबाबतचे परिपत्रक वैद्यकीय शिक्षण संचालनालयाच्या संकेतस्थळावर शनिवारी टाकण्यात आले होते. या प्रक्रियेत अभिमत विद्यापीठांना वगळण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. तर सोमवारी अभिमत विद्यापीठांसाठी स्वतंत्र परिपत्रक काढण्यात आले. त्यामध्ये अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी व गुणवत्ता यादीसाठी माहिती भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांना खासगी व अभिमतसाठी अर्ज भरण्यासाठी स्वतंत्र लिंक देण्यात आलेल्या आहेत.सामाईक प्रवेश कक्षाने काढलेल्या परिपत्रकानुसार सध्या तरी विद्यार्थ्यांना खासगी व अभिमतसाठी स्वतंत्र माहिती भरावी लागणार असल्याचे चित्र आहे. त्यासाठी २४ आॅगस्ट ही मुदत आहे. तर २७ आॅगस्ट रोजी तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. ही गुणवत्ता यादी खासगी व अभिमतसाठी स्वतंत्र असेल की दोन्हीसाठी एकत्रितपणे यादी प्रसिद्ध केली जाईल, याबाबत प्रवेश कक्ष किंवा वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने अधिकृतपणे काहीही स्पष्ट केलेले नाही. अभिमत प्रवेशाचे वेळापत्रकही अर्धवट असून पसंतीक्रम, अर्ज भरणे व पुढील प्रवेश प्रक्रियेबाबत त्यात माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे गुणवत्ता यादीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. याविषयी सायन्स अ‍ॅकॅडमीचे दिलीप शहा म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये अजूनही मोठा संभ्रम आहे. खासगी व अभिमत विद्यापीठासाठी स्वतंत्र अर्ज करायचा की नाही, याबाबत संभ्रम आहे. (प्रतिनिधी)