शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अभिमतमधील वैद्यकीय प्रवेशाबाबत संभ्रम

By admin | Updated: August 21, 2016 21:59 IST

एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश चाचणी (नीट)द्वारेच होणार

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 21 - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यातील खासगी विनानुदानित संस्थांमधील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमांचे प्रथम वर्षाचे प्रवेश राष्ट्रीय पात्रता आणि प्रवेश चाचणी (नीट)द्वारेच होणार असून त्याबाबतचे वेळापत्रकही जाहीर करण्यात आले आहे. मात्र, अभिमत विद्यापीठांना यातून वगळण्यात आल्याचे दिसते. त्यामुळे या विद्यापीठांतील प्रवेशाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. राज्यातील खासगी व अभिमन विद्यापीठांशी संलग्न वैद्यकीय महाविद्यालयांमधील एमबीबीएस व बीडीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश नीटद्वारे होतील, असे यापुर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे नीटचा निकाल स्पष्ट झाल्यानंतर खासगी व अभिमतमधील प्रवेश एकाच वेळी केले जातील, अशी अपेक्षा विद्यार्थी व पालकांना होती. मात्र, राज्य सामाईक प्रवेश चाचणी केंद्राने शनिवारी काढलेल्या परिपत्रकामध्ये केवळ खासगी संस्थांमधील प्रवेशाचा उल्लेख करण्यात आला आहे. राज्यातील १७ खासगी महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या सुमारे १८०० तर २५ महाविद्यालयांमध्ये बीडीएसच्या सुमारे २३०० जागा आहेत. या संस्थांमधील ८५ टक्के जागा नीटद्वारे राज्यस्तरीय कोट्यातून भरल्या जाणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना आॅनलाईन माहिती भरण्यास सांगण्यात आले आहे. दि. २४ आॅगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना आॅनलाईन माहिती भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ही माहिती भरली आहे, तेच प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. तसेच आलेल्या अर्जातून नीटमधील गुणांच्याआधारे राज्य गुणवत्ता यादी प्रसिध्द केली जाणार आहे. केंद्राने प्रसिध्द केलेल्या परिपत्रकामध्ये अभिमत विद्यापीठांशी संलग्न महाविद्यायांमधील प्रवेशाचा उल्लेखही करण्यात आलेला नाही. ह्यअभिमत महाविद्यालये वगळूनह्ण असे त्यामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यात आठ अभिमत विद्यापीठे असून त्यांच्याशी संलग्न ९ महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमध्ये एमबीबीएसच्या सुमारे १५०० जागा आहेत. या जागांवर प्रवेशासाठीही दरवर्षी मोठी चढाओढ असते. अनेक विद्यार्थी-पालक खासगी संस्थांबरोबरच अभिमत विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी अधिक प्राधान्य देतात. मात्र, सध्या राज्य शासनाकडून त्यांच्या प्रवेश प्रक्रियेबाबत कोणत्याही सुचना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठांसह विद्यार्थी व पालकांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. प्रवेशाबाबत शासनाकडून कोणतीही सुचना न आलेल्या काही विद्यापीठांनी त्यांच्या पातळीवर प्रवेश प्रक्रिया सुरूही केली आहे. विद्यापीठ स्तरावरच प्रवेश राहिल्यास नीट गुणांच्या आधारे ही प्रक्रिया राबविली जाणार असली तरी इच्छुक विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यापीठासाठी स्वतंत्र अर्ज करावा लागु शकतो. त्यामध्ये त्यांना आर्थिक भुर्दंडही बसण्याची शक्यता आहे. -------------------अभिमत विद्यापीठांशी संलग्न महाविद्यालयांतील प्रवेशाबाबतच्या निर्णयाची फाईल वैद्यकीय शिक्षण संचालनालयाने वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांकडे पाठविण्यात आली आहे. सोमवारी याबाबतचे चित्र स्पष्ट होईल.- डॉ. प्रविण शिनगारेसंचालक, वैद्यकीय शिक्षण संचालनालय