शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

‘दीपज्योती नमोस्तुते’मध्ये रंगला सूर-नृत्याचा संगम

By admin | Updated: October 31, 2016 02:16 IST

श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे ‘दीपज्योती नमोस्तुते’ हा सोहळा शनिवारी सायंकाळी थाटामाटात रवींद्र नाट्य मंदिरच्या सभागृहात रंगला.

मुंबई : श्रीसिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासातर्फे ‘दीपज्योती नमोस्तुते’ हा सोहळा शनिवारी सायंकाळी थाटामाटात रवींद्र नाट्य मंदिरच्या सभागृहात रंगला. या सोहळ््याला विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी हजेरी लावली होती. या सोहळ््यात प्रथमच अमेरिकेच्या फिलाडेल्फिया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा सन्मान करण्यात आला. या सोहळ््याचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक होते.या सोहळ््यात श्रीसिद्धिविनायक गार्गी पुरस्काराने ज्येष्ठ साहित्यिका तारा भवाळकर यांना, श्रीसिद्धिविनायक सामाजिक पुरस्कार ‘नाम’ फाउंडेशनचे संस्थापक नाना पाटेकर यांच्या वतीने त्यांचा मुलगा मल्हार पाटेकर यांनी स्वीकारला. या सोहळ््यात श्रीसिद्धिविनायक वाल्मिकी पुरस्कार कवी अरुण म्हात्रे यांना, श्रीसिद्धिविनायक व्यास पुरस्कार फिलाडेल्फिया सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंदार जोगळेकर, श्रीसिद्धिविनायक उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांना, श्रीसिद्धिविनायक सुश्रुत पुरस्कार डॉ.मिलिंद कीर्तने यांना देऊन सन्मानित करण्यात आले. तर श्रीसिद्धिविनायक एकलव्य पुरस्कार ललिता बाबर हिच्या वतीने तिची बहीण नकुसा बाबर हिने स्वीकारला. या पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि ५१ हजार रुपये असे होते. या प्रसंगी न्यास व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नरेंद्र राणे, कोषाध्यक्षा अ‍ॅड. निर्मला सामंत प्रभावळकर, कार्यकारी अधिकारी संजीव पाटील आणि उपकार्यकारी अधिकारी रवी जाधव यांच्यासह सदस्यांची उपस्थिती होती. या सोहळ््यात मराठी गीतगायन आणि नृत्याविष्कारांचा रंगतदार कार्यक्रम सादर करण्यात आला. या वेळी श्रीसिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कार्याचा आढावा घेणारी ध्वनिचित्रफित दाखविण्यात आली. नाना पाटेकर यांच्या पुरस्काराची रक्कम ‘नाम’ फाउंडेशनला देण्यात येणार असल्याचे मल्हार यांनी या वेळी जाहीर केले. (प्रतिनिधी)