शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

एफआरपी न देणाऱ्या चार कारखान्यांवर जप्ती

By admin | Updated: May 11, 2016 03:54 IST

आदेश देऊनही ८० टक्के एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप परवाने रद्द करण्यात आले

पुणे : आदेश देऊनही ८० टक्के एफआरपी देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय३ साखर कारखान्यांचे ऊस गाळप परवाने रद्द करण्यात आले असून तर २ कारखान्यांचे गाळप परवाने निलंबित करण्यात आले आहेत. मंगळवारी झालेल्या सुनावणीमध्ये साखर आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी ही कारवाई केली.सोलापूरमधील शंकर सहकारी कारखाना, खासदार संजयकाका पाटील यांचा सांगलीतील यशवंत साखर कारखाना, माजी आमदार राजेंद्र देशमुख यांचा सांगलीतील माणगंगा साखर कारखाना आणि औरंगाबादमधील सिद्धेश्वर साखर कारखाना यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारखान्यांचे गाळप परवाने अगोदर रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही त्यांनी एफआरपीची थकबाकी दिली नाही. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीमध्ये डॉ. शर्मा यांनी जप्तीचे आदेश दिले. सिद्धेश्वर कारखान्याने ४२ टक्केच एफआरपी दिली असून, त्यांच्याकडून ६ कोटी २४ लाख रुपये देणे बाकी आहे. सिद्धेश्वर कारखान्याने ५४ टक्केच एफआरपी दिली असून, त्यांच्याकडून १७ कोटी ८ लाख रुपये एफआरपी देणे बाकी आहे, तर यशवंत कारखान्याने ५६ टक्के एफआरपी दिली असून, त्यांच्याकडून एफआरपीपोटी १४ कोटी २१ लाख रुपये देणे बाकी आहे.सर्व थकबाकी व्याजासह वसूल करून, ती शेतकऱ्यांना देण्यासाठी या कारखान्यांनी उत्पादित केलेली साखर, मोलॅसिस आणि बगॅस यांची विक्री करावी. आवश्यकता असल्यास कारखान्यांच्या मालमत्तेचीही विक्री करावी आणि थकीत रक्कम वसूल करून, ती शेतकऱ्यांना अदा करावी, असे डॉ. शर्मा यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. (प्रतिनिधी)