शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या मेळाव्याला सशर्त परवानगी

By admin | Updated: April 7, 2016 01:57 IST

गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचा ‘आवाज’ घुमणार असला तरी या ‘शांतता क्षेत्र’ असलेल्या शिवाजी पार्कमध्ये ध्वनीक्षेपक वापरण्यास उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे

मुंबई: गुढी पाडव्याला शिवाजी पार्कवर मनसेचा ‘आवाज’ घुमणार असला तरी या ‘शांतता क्षेत्र’ असलेल्या शिवाजी पार्कमध्ये ध्वनीक्षेपक वापरण्यास उच्च न्यायालयाने सक्त मनाई केली आहे. मेळाव्यादरम्यान ध्वनी प्रदूषण नियंत्रण व नियमन, २००० चे उल्लंघन झाल्यास मनसेवर सक्त कारवाई करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि महापालिकेला दिला आहे. त्यामुळे राज ठाकरे यांना आता ‘आवाज’ चढवता येऊ शकत नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) शिवाजी पार्कवर गुढीपाडवा मेळावा आयोजित करण्यासाठी मुंबई महापालिकेने फेब्रुवारीमध्येच परवानगी दिली आहे,तर ४ मार्च रोजी शिवाजी पार्क पोलिसांनी मेळाव्यासाठी ध्वनीक्षेपक वापरण्याची मुभा दिली. याविरुद्ध वेकॉम ट्रस्टने उच्च न्यायालयात अर्ज केला. शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ जाहीर करूनही पोलिसांनी मनसेला ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी दिली कशी? असा प्रश्न याचिकाकर्त्या ट्रस्टने उपस्थित केला. या अर्जावरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. प्रकाश नाईक यांच्या खंडपीठापुढे होती.‘कायद्यांतर्गत ‘शांतता क्षेत्रा’ मध्ये ध्वनीक्षेपक वापरणे गुन्हा आहे, असे असतानाही तुम्ही ध्वनीक्षेपक वापरण्यास परवानगी देता? तुमची (राज्य सरकार) भूमिका स्पष्ट करा,’ असे खंडपीठाने म्हटले. मात्र मुख्य सरकारी वकील पूर्णिमा कंथारिया या प्रश्नावर खंडपीठाला समाधानकारक उत्तर देऊ शकल्या नाहीत. त्यावर मनसेतर्फे ज्येष्ठ वकील व्ही. थोरात यांनी मुळातच शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ म्हणून जाहीर करण्यात आले नसल्याचे खंडपीठाला सांगितले.‘तुम्हाला महापालिका आणि पोलिसांकडून ‘शांतता क्षेत्रा’च्या आधारावरच परवानगी देण्यात आली आहे. शिवाजी पार्क ‘शांतता क्षेत्र’ नाही, असे तुमचे म्हणणे असेल तर त्याअंतर्गत मिळालेल्या दोन्ही परवानगी नाकारा. पुन्हा नव्याने अर्ज करा आणि तुमचा मुद्दा सरकार आणि महापालिकेपुढे मांडा,’ असा टोलाही खंडपीठाने उच्च न्यायालयाला लगावला. या मेळाव्यादरम्यान ध्वनीक्षेपक लावणार नसून साऊंड डिस्ट्रीब्यूशन सिस्टिम वापरण्यात येईल, असे अ‍ॅड. थोरात यांनी सांगितले. ‘मेळाव्यादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास महापालिका आणि राज्य सरकारने कायद्यानुसार कारवाई करावी. आवश्यकता पडल्यास फौजदारी कारवाईही करावी,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला १३ एप्रिलपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)‘मेळाव्यादरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास महापालिका आणि राज्य सरकारने कायद्यानुसार कारवाई करावी. आवश्यकता पडल्यास फौजदारी कारवाईही करावी,’ असे म्हणत खंडपीठाने राज्य सरकारला १३ एप्रिलपर्यंत कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.