शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

अमरनाथ यात्रेतील जखमींची प्रकृती स्थिर

By admin | Updated: July 14, 2017 05:06 IST

अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या डहाणूतील सात भाविकांची प्रकृती स्थिर आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क बोर्डी : अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या डहाणूतील सात भाविकांची प्रकृती स्थिर आहे. मात्र अद्याप त्यांना शासनाकडून कोणतीही मदत मिळालेली नाही. गीताबेन रावल यांच्या उजव्या पायाच्या घोट्यात घुसलेली गोळी जम्मूच्या हॉस्पिटलमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेत काढली होती. मात्र गोळीचा काही भाग आतमध्ये असल्याचे एक्सरेद्वारे लक्षात आल्यानंतर शस्त्रक्रियेद्वारे तो काढण्यात यश आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून त्या श्रद्धा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. योगिता व यशवंत डोंगरे यांच्यावर सूरतच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यशवंत यांच्या कमरेतील गोळी काढली आहे.तर भाग्यामणी ठाकूर यांच्यावरही उपचार सुरू आहेत. मृत भाविकांच्या कुटुंबीयाकडे शासनाने १० लाखांचा धनादेश सुपूर्त केला परंतु जखमींना कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. त्यामुळे यात्रेच्या निमित्ताने झालेला खर्च शिवाय या जखमांवर होणारा महागडा वैद्यकीय खर्च त्यांना परवडणारा नाही. त्यामुळे शासनाने तातडीची मदत जाहीर करणे आवश्यक आहे. या हल्यात डोक्याला मार लागलेले प्रकाश वजाणी जखमी असून ते घरीच उपचार घेत आहेत.केंद्र शासन व जम्मू काश्मीर सरकारकडून जखमींना मदत दिली जाणार आहे. या बाबत जखमींचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत, असे पालघरचे निवासी उप जिल्हाधिकारी नवनाथ जरे यांनी सांगितले.घोडा यांच्याकडून विचारपूसकासा : पालघरचे आमदार अमित घोडा बुधवारी सुरतला गेले व तेथील सिव्हिल रुग्णालयात जाऊन त्यांनी दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या कासा येथील यशवंत व योगीता डोंगरे यांची विचारपूस केली.