शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्राची अट शिथिल

By admin | Updated: January 23, 2015 01:19 IST

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जात प्रमाणपत्र जोडण्याची अट ग्राम विकास खात्याने शिथिल केली

यदु जोशी - मुंबईग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करताना सोबत जात प्रमाणपत्र जोडण्याची अट ग्राम विकास खात्याने शिथिल केली असून या निर्णयावर लवकरच राज्य मंत्रिमंडळाची मोहोर उमटेल. चालू वर्षी राज्यातील तब्बल १५ हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. उमेदवारी अर्जासोबत जातीचा दाखल सादर न केल्यामुळे ग्राम पंचायतीच्या गणाची निवडणूकच होऊ शकली नाही, अशी शेकडो उदाहरणे राज्यात आहेत. त्यामुळे अर्जासोबत जातीचा दाखला देण्याची सक्ती मागे घ्यावी, अशी मागणी मोठ्या प्रमाणात होती. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी या मागणीची दखल घेत ही सक्ती शिथिल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. नवीन प्रस्तावानुसार उमेदवारी अर्ज भरल्यानंतर विशिष्ट कालावधीत जातीचा दाखला सादर करण्याची अट राहील. त्यामुळे जातीच्या दाखल्याअभावी कोणीही निवडणुकीपासून वंचित राहणार नाही. जातीचा दाखला उमेदवारी अर्जासोबत देण्याचे बंधन पाच वर्षांपूर्वीही विशिष्ट कालावधीसाठी शिथिल करण्यात आले होते, पण नंतर ही सक्ती कायम ठेवण्यात आली. जातीच्या दाखल्याची अट शिथिल करायची की नाही हा सर्वथा ग्रामविकास विभागाचा अधिकार आहे. माझ्या मते ग्राम पंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये सहा महिने आधी जातीचे दाखले देण्याची विशेष मोहीम राबविली पाहिजे. ऐन निवडणुकीच्या वेळी जात प्रमाणपत्राची अडचण होणार नाही.- जे.एस.सहारिया, राज्य निवडणूक आयुक्तजातीच्या दाखल्यांबाबतचा गोंधळ कायमचा दूर करायचा तर प्रत्येक कुटुंबाला रेशन कार्डाप्रमाणे जातीच्या दाखल्याचे कार्ड द्यायला हवे. - नीला सत्यनारायण,माजी राज्यनिवडणूक आयुक्तच्राज्यात २०१५मध्ये १४ हजार ३७४ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार आहे. त्यातील सर्वाधिक ५५९५ ग्रा.पं.ची निवडणूक आॅगस्टमध्ये आहे.च्मेमध्ये १ हजार ४०१, सप्टेंबरमध्ये ३७६४, नोव्हेंबरमध्ये २ हजार २२६ ठिकाणी निवडणूक होणार असून, ग्रामीण महाराष्ट्राचे राजकीय चित्र स्पष्ट होणार आहे.