शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रवेशाची चिंता

By admin | Updated: January 10, 2016 01:03 IST

बारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच

- योगेश पांडे,  नागपूरबारावीच्या परीक्षेला अद्याप दीड महिन्याचा अवकाश असताना राज्यातील काही अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये मात्र बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. प्रवेश कसे वाढतील, या मुद्यावरच या बैठकांमध्ये भर देण्यात येत आहे. दर वर्षी वाढणाऱ्या रिक्त जागांच्या प्रमाणामुळे राज्यभरातील अभियांत्रिकी महाविद्यालयांसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. त्यामुळेच परीक्षांच्या अगोदरच ‘मार्केटिंग’ कसे करता येईल या संदर्भात चाचपणी सुरू आहे.राज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या. प्रवेशच नसल्यामुळे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांची स्थिती अडचणीची झाली आहे. याचा फटका तेथील प्राध्यापकांनादेखील बसत असून, अनेक ठिकाणी तर ६-६ महिने वेतन मिळालेले नाही. केंद्रीय प्रवेश प्रक्रियेच्या (कॅप) अंतर्गत विद्यार्थी नामवंत महाविद्यालयांनाच जास्त प्राधान्य देतात. हीच बाब लक्षात घेता व्यवस्थापन ‘कोटा’मधून मिळतील तितके प्रवेश करण्याचा महाविद्यालयांचा प्रयत्न असतो.बाहेरील राज्यांकडूनदेखील निराशागेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयांचे प्राध्यापक व प्रतिनिधी विद्यार्थी शोधण्यासाठी चक्क बिहार, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर व पंजाब या राज्यांकडे धाव घेताना दिसून आले. विविध ‘आॅफर्स’ देऊनही मागील वर्षी हवा तसा प्रतिसाद लाभला नव्हता. त्यामुळे काही महाविद्यालयांनी अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेसाठी घेण्यात येणाऱ्या शिकवणी वर्गांच्या चालकांशीच संपर्क साधला आहे.विदर्भ, मराठवाड्याला फटकामुंबई, पुण्याकडील महाविद्यालयांत प्रवेश घेण्याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचा कल असतो. याचा फटका विदर्भ व मराठवाड्यातील महाविद्यालयांना बसताना दिसून येतो. गेल्या काही वर्षांत ‘बेसिक सायन्स’कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे सोबतच महाविद्यालयांच्या दर्जाचादेखील प्रश्न आहेच. या विविध कारणांमुळे रिक्त जागांचे प्रमाण वाढीस लागले आहे, असे मत तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी व्यक्त केले. ४२ टक्के जागा रिक्तराज्यातील ३६७ अभियांत्रिकी महाविद्यालयांत १ लाख ५३ हजार ८६७ जागा आहेत. २०१५-१६ या वर्षात यापैकी ६४ हजार ६३५ म्हणजेच सुमारे ४२ टक्के जागा रिक्त होत्या. अगदी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांत देखील जागा रिक्त होत्या. राज्यातील अभियांत्रिकी प्रवेशाची स्थितीवर्षजागारिक्त जागा२०१०-१११,१४,२६८२०,८४०२०११-१२१,३४,०२४३०,७१५२०१२-१३१,४८,२९४४१,६०३२०१३-१४१,५४,८२७५२,४००२०१४-१५१,६३,०००६४,००० (सुमारे)२०१५-१६१,५३,८६७६४, ६२५