शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

संगणकीकृत सातबारा दुरुस्ती युद्धपातळीवर

By admin | Updated: June 13, 2016 01:36 IST

खेड तालुक्यातील संगणकीकृत सातबारा रेकॉर्डमधील चुका सुधारण्यासाठी राजगुरुनगर येथे युद्धपातळीवर काम सुरू

राजगुरुनगर : खेड तालुक्यातील संगणकीकृत सातबारा रेकॉर्डमधील चुका सुधारण्यासाठी राजगुरुनगर येथे युद्धपातळीवर काम सुरू असून, तालुक्यातील सर्व गावांचे तलाठी आणि मंडलाधिकारी त्यासाठी येथे तळ ठोकून आहेत. खेड तालुक्यात १८९ महसुली गावे आहेत. त्यांसाठी एकूण ५५ तलाठी सज्जे आणि ९ मंडल आहेत. तालुक्यात दीड लाखावर सातबारा उतारे आहेत. शासनाने सर्व महसुली रेकॉर्ड इंटरनेटवर घेऊन सातबारा आॅनलाइन देण्याचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार खेड तालुक्यात आॅनलाइन सातबारा २३ आॅक्टोबर २०१५ पासून देण्यात येईल, असे घोषित करण्यात आले होते. सर्व सातबारा आॅनलाइन करण्याचे काम पूर्ण झाले नसतानाच ही घोषणा करण्यात आली. अनेक त्रुटी असल्याने चुकांचे प्रमाण वाढतच होते. त्यामुळे नागरिकांना सातबारा वेळेवर मिळत नव्हते. यातून नागरिक आणि तलाठी-मंडलाधिकारी असा संघर्ष होत होता.शेवटी शासनाने संगणकावरील रखडलेल्या नोंदी पूर्ण करण्यासाठी आणि हस्तलिखित सातबारावरील सर्व प्रकारच्या नोंदी इंटरनेटवर अपलोड करण्यासाठी ३० जूनपर्यंत कर्मचाऱ्यांना मुदत दिली आहे. म्हणून या दुरुस्त्या आणि नोंदी पूर्ण करण्यासाठी खेड तालुक्यातील ४५ तलाठी आणि ९ मंडलाधिकारी राजगुरुनगर येथील नगरपरिषदेच्या सभागृहात काम करीत आहेत. त्यासाठी खेडचे तहसीलदार सुनील जोशी यांनी इंटरनेट, वायफाय, बटरी बॅकअप उपलब्ध करून दिला आहे. ‘एडिट मॉडेल प्रणाली’ या प्रणालीच्या आधारे सातबारे दुरुस्त करून इंटरनेटवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जुलै महिन्यापासून साताबारचे उतारे संगणकावर सर्व दुरुस्त्या आणि बदलासह प्राप्त होतील. तहसीलदार सुनील जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम सुरू असून, स्मिता कुलकर्णी, तालुका डाटा आॅपरेटर संकेत तनपुरे, मंडलाधिकारी अशोक सुतार, डी. एन. खोमणे, डी. पी. उगले, एच. ए. सोनवणे आदी नियंत्रण करीत आहेत. (वार्ताहर) सातबारे आॅनलाइन करण्याबाबत शासन ठाम आहे. थोडा त्रास झाला, तरी पुढे लोकांना ते फार सोयीचे होणार आहे. खरेदीखत, गहाणखत, बँकांची कर्ज प्रकरणे इत्यादी कामांसाठी लोकांना सातबारा लागतात. मात्र हस्तलिखित सातबारा आणि संगणकीय सातबारा यात तफावती आढळत असल्याने या कामांमध्ये अडचणी येत होत्या. तलाठी संघटनेने शासनाला या अडचणी सांगितल्या. म्हणून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून ‘एडिट मॉडेल प्रणाली’ उपलब्ध करून दिली आणि आता तीद्वारे महसूल रेकॉर्ड अद्ययावत करण्यात येणार आहे, असे तहसीलदार जोशी यांनी सांगितले.