शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

संगणकीय मराठीतील उपक्रम सुरू करणार

By admin | Updated: February 24, 2016 01:39 IST

मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने आगामी काळात संगणकीय मराठी, दलित ग्रामीण शब्दकोशांच्या पुढील आवृत्ती व सूची, शेतीकोश, परिभाषा कोश यांची निर्मिती करण्यात

मुंबई : मराठी भाषेचे संवर्धन आणि जतन करण्याच्या दृष्टीने आगामी काळात संगणकीय मराठी, दलित ग्रामीण शब्दकोशांच्या पुढील आवृत्ती व सूची, शेतीकोश, परिभाषा कोश यांची निर्मिती करण्यात येणार असून, बोली भाषेतील नाट्यस्पर्धा आयोजन करण्याबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल, तसेच अमराठी भाषिकांमध्ये मराठी भाषेचे महत्त्व वाढविण्यासाठी भाषेमध्ये संगीताचा वापर करण्यात येणार आहे.राज्य मराठी विकास संस्थेच्या नवनिर्वाचित नियामक मंडळाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषामंत्री विनोद तावडे, मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष बाबा भांड आदी मान्यवर उपस्थित होते. या बैठकीबाबत सांगताना, मराठी भाषामंत्री तावडे यांनी सांगितले की, ‘विकिपिडियाच्या धर्तीवर संगणकीय मराठी भाषेचा विकास करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील बळीराजाच्या माहितीसाठी शेतीकोश तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.’ त्याच पद्धतीने मराठीतील देवनागरी आणि मोडी लिपीचे प्रशिक्षण देण्याचे कार्यक्रम सुरू करण्यात येणार असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले. राज्य मराठी विकास संस्थेंतर्गत होणाऱ्या भविष्यातील प्रकल्पासाठी मराठी भाषामंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी समिती स्थापन करण्यात येणार आहे. या संस्थेंतर्गत मराठी संकेतस्थळाची स्पर्धा, मराठी ग्रंथ सूचीमाला वस्त्रनिर्मिती माहिती कोश, वैज्ञानिक पुस्तकांचा अनुवाद आदी प्रकल्प अग्रक्रमाने हाती घेण्यात येणार आहेत, तसेच उच्च न्यायालयाच्या कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून, या संदर्भात मुख्यमंत्री लवकरच मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांशी चर्चा करणार आहेत, असेही तावडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)भाषा समृद्धीसाठी प्रयत्न होणारमराठी भाषा जगली पाहिजे, ती सर्वमान्य झाली पाहिजे, त्यासाठी पूरक कार्यवाही करणे आवश्यक आहे. मराठी भाषेच्या समृद्धीसाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले की, ‘राज्य मराठी विकास संस्थेनी मराठी भाषेच्या समृद्धीसाठी हाती घेतलेले प्रकल्प महत्त्वपूर्ण आहेत. या संस्थेच्या माध्यमातून मराठी भाषेच्या समृद्धीसाठी वातावरण तयार करता येईल.’