शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

नागरी पतसंस्थांसाठी ‘सामोपचारा’ची तडजोड

By admin | Updated: March 27, 2015 23:38 IST

राज्यातील १७ हजार नागरी सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाने ‘सामोपचारा’चा हात पुढे केला आहे. अडचणीत आलेल्या या संस्थांना सावरण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे.

विलास गावंडे ल्ल यवतमाळ राज्यातील १७ हजार नागरी सहकारी पतसंस्थांच्या बळकटीकरणासाठी सहकार विभागाने ‘सामोपचारा’चा हात पुढे केला आहे. अडचणीत आलेल्या या संस्थांना सावरण्यासाठी पुन्हा संधी देण्यात आली आहे. ‘सामोपचार परतफेड योजनेला’ मुदतवाढ देताना संस्थेसोबतच कर्जदारांनाही दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पतसंस्थांनीही वसुलीसाठी चांगले प्रयत्न करण्याची गरज शासनाने व्यक्त केली आहे.कर्ज वसुलीचे प्रमाण नगण्य असल्याने नागरी सहकारी पतसंस्थांचा ‘एनपीए’ वाढला. परिणामी, थकीत कर्जाची तरतूद पतसंस्थांनाच करावी लागत आहे. ठेवीदारांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. अनेक संस्थांमधील ठेवी कमी झाल्या. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ठेवी काढल्या गेल्या. यामुळे अनेक पतसंस्था अडचणीत आल्या. वसुलीसाठी चांगले प्रयत्न पतसंस्थांकडून होत नसल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या संस्था टिकाव्यात यासाठी शासनाच्या सहकारी विभागाने पुढाकार घेत राज्यातील सर्व नागरी सहकारी पतसंस्थांसाठी ‘सामोपचार परतफेड’ योजनेला २००७ मध्ये मान्यता दिली होती. यानंतरही काही संस्थांचा ‘एनपीए’ कमी झाला नाही; परंतु काही संस्थांची कामगिरी चांगली राहिली. त्यामुळे सहकार विभागाने या योजनेला पुन्हा दोन वर्षे मुदतवाढ देण्याची विनंती शासनाकडे केली. सहकार आयुक्तांच्या प्रस्तावावरून शासनाने २६ मार्च रोजीच्या निर्णयानुसार सदर योजनेला ३१ मार्चपर्यंत सशर्त अटींसह मुदतवाढ दिली आहे. संस्थेला ‘एनपीए’तून बाहेर काढण्यासाठी या संस्थांना ही चांगली संधी असून, सहकार चळवळीला बळकटीसाठी त्या दृष्टीने प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.४कर्ज ‘एनपीए’ ठरविण्यासाठी कट आॅफ डेट ३१ मार्च २०११ निश्चित करण्यात आली आहे. कर्जदार तडजोडीचा व्याजदर १२ टक्के राहणार आहे. तडजोडीची रक्कम एक रकमी भरणार असल्यास व्याजाची आकारणी आठ टक्के दराने करण्याची मुभा राहणार आहे.शासनाने घेतलेला निर्णय सहकार चळवळीला बळकटी देणारा आहे. ‘एनपीए’ वाढलेल्या संस्थांनी या संधीचा लाभ घेतला पाहिजे. पतसंस्था स्वत:चे नुकसान करून घेत कर्जदारांना आपले कर्ज खाते ‘निल’ करण्याची संधी देत आहे. त्यामुळे त्यांनीही सहकार्य केले पाहिजे.-राजुदास जाधव,उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशन, मुंबई