शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

अद्ययावत संगणक शिक्षण सुविधांसाठी भरीव तरतूद

By admin | Updated: March 4, 2017 03:04 IST

रोहा अष्टमी नगरपरिषदेचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सादर केला

रोहा : रोहा अष्टमी नगरपरिषदेचा सन २०१७-१८ चा अर्थसंकल्प नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी सादर केला. ३१ कोटी ७९ लाख ४७ हजार रु पये उत्पन्नाचा आणि ३१ कोटी ७६ लाख ४५ हजार ५०० रुपये खर्चाचा आणि ३ लाख १ हजार ५०० रु पयांचा शिलकीचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. अद्ययावत संगणक शिक्षण सुविधांसाठी पंचवीस लाखांची भरीव तरतूद करण्यात आली आहे.रोहा नगरपरिषद शिक्षण मंडळ बरखास्त होऊन त्याचा नगरपरिषद विषय समित्यांमध्ये समावेश केल्याने नगरपरिषदेच्या शहरातील सर्व शाळा आता नगरपरिषदेच्या अधिपत्याखाली आल्या आहेत. यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागाबाबत तरतूद होणे अपेक्षित होते. त्यानुसार प्राथमिक विभागाच्या ई - लर्निंग सुविधेकरिता, माध्यमिक विभागाकरिता, संगणक प्रशिक्षणाकरिता तरतूद करण्यात आली आहे. यामुळे नगरपरिषद शाळांतील विद्यार्थ्यांनाही अद्ययावत शिक्षण मिळणार आहे.रोहा अष्टमी नगरपालिकेची अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकाची विशेष सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांच्या अध्यक्षतेखाली १६ फेब्रुवारी रोजी सकाळी नगरपालिकेच्या द.ग.तटकरे सभागृहामध्ये घेण्यात आली. त्यातील तरतुदींची अधिकृत माहिती ३ मार्चला शुक्रवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. या सभेला उपनगराध्यक्षा शिल्पा धोत्रे, नगरपालिका मुख्याधिकारी प्रकाश पाटील, गटनेते महेंद्र दिवेकर, सभापती समीर सकपाळ, सभापती रिदवाना शेटे, सभापती पूर्वा मोहिते, सभापती महेश कोल्हटकर, नगरसेवक अहमद दर्जी, महेंद्र गुजर, जुबेर चोगले, आफरिन रोगे, नगरसेविका सारिका पायगुडे, नेहा पिंपळे, सुजाता चाळके, गीता पडवळ, स्नेहा अंबरे, समीक्षा बामणे, स्वीकृत नगरसेवक सुभाष राजे, महंमद डबीर, आदि उपस्थित होते. (वार्ताहर)>मोठ्या व्यवसायात करवाढया अर्थसंकल्पात दारूची दुकाने व मोठे हॉटेल व्यावसायिक यामध्ये कर दरवाढ केली असून घरपट्टी व पाणीपट्टी करात कोणतीही कर दरवाढ न करता तशीच कायम ठेवण्यात आली आहे. अर्थसंकल्प सभेपुढे सादर झाल्यानंतर त्यावरील चर्चेमध्ये सर्व नगरसेवकांनी भाग घेतला होता. रोहा नगर पालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनंतरची ही पहिली सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली>शिक्षणासाठी विशेष तरतूद६ लाख : प्राथमिक विभाग ई-लर्निंग सुविधा३ लाख : माध्यमिक विभागाकरिता १० लाख : प्राथमिक शाळांतील संगणक प्रशिक्षण६ लाख : माध्यमिक शाळांतील संगणक प्रशिक्षण