शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
4
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
5
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
6
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
7
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
8
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
9
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
10
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
11
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
12
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
13
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
14
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
15
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
16
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
17
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
18
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
19
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
20
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंदला राज्यात संमिश्र प्रतिसाद

By admin | Updated: July 5, 2016 01:35 IST

राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. याउलट मुंबईतील संघटनांनी मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती

मुंबई : राज्यातील सर्व खाजगी शिक्षण संस्थांनी सोमवारी पुकारलेल्या शाळा बंद आंदोलनाला राज्यातून संमिश्र प्रतिसाद मिळाला. याउलट मुंबईतील संघटनांनी मात्र महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीच्या मागण्यांना नैतिक पाठिंबा देत, आंदोलनाकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले.आंदोलने करूनही शिक्षणमंत्री बैठक घेत नसल्याची कृती समितीची तक्रार आहे. त्यामुळे समितीने सोमवारी शाळा बंदचे आवाहन केले होते. मात्र मुंबईतील प्रमुख संघटना असलेल्या शिक्षक परिषद आणि शिक्षक भारती यांनी शाळा बंद आंदोलनात सहभाग घेतला नाही. याबाबत विचारणा केली असता, शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे म्हणाले की, समितीच्या मागण्या रास्त आहेत. मात्र विद्यार्थ्यांचे नुकसान करून बंदमध्ये सामील होता येणार नाही. त्यामुळे शिक्षक परिषद शाळा बंद आंदोलनात सामील झालेली नाही. शिक्षक भारतीचे अशोक बेलसरे म्हणाले की, विद्यार्थ्यांना वेठीस धरून केलेल्या कोणत्याही आंदोलनाला संघटना पाठिंबा देऊ शकत नाही. कृती समितीने केलेल्या मागण्यांना संघटनेने पाठिंबा दिला आहे. मात्र अशा प्रकारे शाळा बंद ठेवून संघटना आंदोलन करणार नाही. (प्रतिनिधी)१२ दिवसांची मुदतराज्यातील भारतीय जनता पार्टीशी संलग्नित संस्थाचालकांनी बंदमध्ये सहभाग घेतला नाही. राज्यभर मिळालेल्या संमिश्र प्रतिसादानंतर सरकारला १२ दिवसांची मुदत देण्यात येत आहे. यादरम्यान शिक्षणमंत्र्यांनी बैठक घेतली नाही, तर १६ जुलैपासून शाळा बेमुदत बंद ठेवण्यात येतील.- मनोज पाटील, कृती समितीचे पदाधिकारी