शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

७१,५९८ कोटींचे प्रकल्प पूर्ण करणार

By admin | Updated: May 12, 2016 03:34 IST

रेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रात ५२,६१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ३५ रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय सात नव्या रेल्वे प्रकल्पांवरही विचार केला

शीलेश शर्र्मा, नवी दिल्लीरेल्वे मंत्रालयाने महाराष्ट्रात ५२,६१४ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ३५ रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याचे लक्ष्य निर्धारित केले आहे. याशिवाय सात नव्या रेल्वे प्रकल्पांवरही विचार केला जात आहे आणि या प्रकल्पांसाठी १८,९८४ कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद सुनिश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता ७१,५९८ कोटी रुपये खर्चाचे रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहेत. या प्रकल्पांबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी राज्यसभेत दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी महाराष्ट्रातील रेल्वे मंत्रालयाच्या प्रकल्पांबद्दलची विस्तृत माहिती मागितली होती. दर्डा यांना रेल्वे प्रकल्पांविषयीची माहिती देताना प्रभू म्हणाले, ७१,५९८ कोटी रुपयांचे हे रेल्वेप्रकल्प पूर्ण करण्यासाठी रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकार संयुक्तपणे एका नव्या कंपनीची स्थापना करणार आहे. या कंपनीची स्थापना लवकरच केली जाईल, अशी आशा आहे. हे सर्व रेल्वे प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी या कंपनीवर राहील. मुंबईबाबतची रेल्वे मंत्रालयाची भूमिका स्पष्ट करताना रेल्वेमंत्री प्रभू म्हणाले, मुंबईसाठी अतिरिक्त १९,२३७ कोटी आणि ३५ हजार कोटींचे प्रकल्प तयार केले जातील. ज्यामुळे महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक केली जाऊ शकेल.प्रकल्प पूर्ण करण्याच्या मार्गात येणाऱ्या अडचणींचा उल्लेख करताना प्रभू म्हणाले, भूसंपादन ही सर्वांत मोठी समस्या आहे. ही समस्या नेहमीच भेडसावत असते. भूसंपादनासाठी रेल्वे कायदा आहे, हे खरे असले तरी राज्य सरकारने भूसंपादनासाठी रेल्वे मंत्रालयाला सहकार्य केले पाहिजे. नुकसान भरपाईच्या संदर्भात राज्य सरकारला जी नुकसान भरपाईची रक्कम उचित वाटेल, ती देण्यास रेल्वे मंत्रालय तयार आहे.