शहरं
Join us  
Trending Stories
1
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
2
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
4
"मला फक्त ५ मिनिटे आधी कळालं..."; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वेंसच्या पत्नी उषा यांचा खुलासा
5
झटपट पैसे कमावण्यासाठी पती-पत्नीने सुरू केला असा धंदा, अश्लील चॅट, व्हिडीओ आणि...
6
Shefali Jariwali Death: "बिग बॉस शापित आहे", शेफाली जरीवालाच्या निधनानंतर अभिनेत्रीची पोस्ट
7
Philippines Earthquake: फिलीपिन्समध्ये ६.० तीव्रतेचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
8
आता मोबाइल ॲपद्वारे कुठूनही करता येणार मतदान; कोणत्या मतदारांना मिळणार अधिकार?
9
Shefali Jariwala: शेफाली जरीवालाच्या शेवटच्या एक्स पोस्टमध्ये 'या' व्यक्तीच्या नावाचा उल्लेख!
10
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
11
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
12
तरुण जोडप्यांना मुलांची आस, पण तरीही का घसरतोय देशाचा प्रजनन दर?
13
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
14
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
15
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
16
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
17
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
18
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
19
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
20
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!

अकोल्यातील धान्य घोटाळ्याचा तपास पूर्ण

By admin | Updated: June 30, 2015 02:53 IST

केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील धान्य घोटाळा प्रकरणाचा दिल्ली येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाकडून गत आठवडाभरापासून सुरू असलेला

अकोला : केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील धान्य घोटाळा प्रकरणाचा दिल्ली येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाकडून गत आठवडाभरापासून सुरू असलेला तपास सोमवारी पूर्ण करण्यात आला.सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अकोला जिल्ह्यात भारतीय खाद्य निगममार्फत (एफसीआय) केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातून धान्याचे वितरण करण्यात येते. त्यामध्ये अकोल्यातील देशमुख फैलमधील केंद्रीय वखार महामंडळाच्या गोदामातील धान्यसाठ्यात कोट्यवधी रुपयांच्या धान्यसाठ्याची अफरातफर झाल्याचे प्रकरण मार्च २०१४मध्ये उघडकीस आले होते. या प्रकरणात केंद्रीय वखार महामंडळाचे अकोल्यातील तत्कालीन व्यवस्थापक रामण्णा राव आणि चार कर्मचाऱ्यांविरुद्ध रामदासपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. वर्षभरानंतर या धान्य घोटाळ्याचा तपास करण्यासाठी डी.जी. मीणा यांच्या नेतृत्वात दिल्ली येथील ‘सीबीआय’च्या चार अधिकाऱ्यांचे एक पथक अकोल्यात आले. त्यामध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत ‘एफसीआय’मार्फत केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात उपलब्ध झालेला धान्यसाठा, उपलब्ध धान्यसाठ्यातून करण्यात आलेले वितरण आणि झालेली अफरातफर यासंबंधीची सविस्तर माहिती घेऊन, ‘सीबीआय’च्या पथकाकडून सखोल तपास करण्यात आला. तपासानंतर दोषींवर काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)केंद्रीय वखार महामंडळाच्या अकोल्यातील गोदामात झालेल्या धान्य घोटाळ्याचा तपास करण्यासाठी २२ ते २६ जून या काळाकरिता ‘सीबीआय’ अधिकाऱ्यांचे पथक अकोला दौऱ्यावर आले होते. मात्र, तपास पूर्ण झाला नसल्याने, सीबीआय पथकाकडून तीन दिवस (२९ जूनपर्यंत) मुक्काम वाढविण्यात आला. त्यामुळे धान्य घोटाळा मोठा असल्याने तपास पूर्ण करण्यासाठी ‘सीबीआय’ला मुक्काम वाढवावा लागल्याचे स्पष्ट होत आहे.