विजय दर्डा यांची मागणी : मंत्री बदलले म्हणून धोरण बदलू नये !नागपूर : विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाऱ्या वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वेमार्गाचे काम त्वरित पूर्ण करावे, त्यासाठी आवश्यक निधी रेल्वे मंत्रालयाने उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी लोकमत एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन आणि खासदार विजय दर्डा यांनी केली. मध्य रेल्वेतर्फे बुधवारी नागपूर येथे आयोजित नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांच्या बैठकीत खा. दर्डा यांनी रखडलेल्या रेल्वे प्रकल्पांबाबत आग्रही भूमिका घेतली. रेल्वेमंत्री बदलले म्हणून धोरण बदलू नये, अशा शब्दात नाराजी व्यक्त करीत पूर्वीच्या रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या घोषणांची पूर्तता रेल्वे मंत्रालयाने करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मध्य रेल्वेतर्फे नागपूर आणि भुसावळ विभागातील खासदारांची बैठक बुधवारी नागपूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली. बैठकीला खा. विजय दर्डा, खा. अजय संचेती, खा. रामदास तडस, खा. प्रतापराव जाधव, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद, मुख्य प्रशासकीय अधिकारी एम. के. गुप्ता, नागपूरचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक ओ. पी. सिंह उपस्थित होते. बैठकीत खा. दर्डा म्हणाले, वर्धा जिल्ह्णात महात्मा गांधी यांचा सेवाग्राम आश्रम आहे तर नांदेड येथे गुरुगोविंद सिंग यांचा गुरुद्वारा आहे. वर्धा, यवतमाळ, नांदेड हा मागास भाग आहे. येथील शेतकऱ्यांसाठी स्वस्तात माल वाहतुकीची सुविधा नाही. वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे मार्ग शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरू शकतो. या रेल्वे मार्गाला २००९ च्या रेल्वे अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली होती. २७० किमी लांबीच्या या मार्गासाठी ६९७ कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. १२ फेब्रुवारी २००९ रोजी तत्कालीन रेल्वे मंत्री लालूप्रसाद यादव व तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत या मार्गाचे भूमिपूजन झाले होते. त्यावेळी लालूप्रसाद यादव यांनी संबंधित मार्ग तीन वर्षात पूर्ण करण्याची घोषणा केली होती. एवढेच नव्हे संसदेतही तसे आश्वासन देण्यात आले होते. त्या आश्वासनाची पूर्तता होणार की नाही, असा प्रश्न खा. दर्डा यांनी बैठकीत उपस्थित केला. (प्रतिनिधी)जेवण व्यवस्थित नाही; झुरळही फिरतातच्नागपुरात रेल्वे गाड्यांमध्ये मिळणारे भोजन झोपडपट्ट्यांमध्ये तयार केले जाते. ते जेवण निकृष्ट दर्जाचे असते. यामुळे प्रवाशांना अन्नबाधा होण्याचा धोका असतो. एसी कोचमध्ये मिळणाऱ्या बेडशीट स्वच्छ नसतात. त्यावर झुरळ फिरत असतात. उंदरांचाही त्रास प्रवाशांना सहन करावा लागतो. प्रवाशांना होण्याऱ्या या त्रासाकडे खा. दर्डा यांनी लक्ष वेधले. यावर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक सुनीलकुमार सूद यांनी या सर्व बाबींची तातडीने दखल घेऊन उपाय योजले जातील. झुरळांचा नायनाट केला जाईल, असे आश्वस्त केले. च्नागपूर रेल्वे स्थानकावर फ्लॅटफॉर्म क्रमांक १, २ व ५ वर रेल्वे रुळाच्या खाली काँक्रिटिंग उखडलेले आहे. त्यामुळे रुळाखाली साचणारी घाण निघून जात नाही. अस्वच्छता कायम राहते. त्यामुळे उखडलेले काँक्रिटिंग दुरुस्त करण्याची व अप्रॉन्सच्या गुणवत्तेत सुधार करण्याची मागणी खा. दर्डा यांनी केली. च्यावर सूद यांनी सांगितले की, भविष्यात रेल्वेत ग्रीन टॉयलेट लागणार आहेत. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून नवे अॅप्रान देणेच बंद करण्यात आले आहे. यावर दर्डा यांनी ग्रीन टॉयलेटची अंमलबजावणी होण्यास काही वर्षे लागली तर तोवर हीच परिस्थिती कायम राहणार का, असा प्रश्न उपस्थित केला.
वर्धा - नांदेड रेल्वे मार्गाचे काम पूर्ण करा
By admin | Updated: February 5, 2015 01:47 IST