शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

संपूर्ण कर्जमाफीसाठी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2017 18:08 IST

केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे.

ऑनलाइन लोकमतवर्धा, दि. 30 - केंद्र व राज्य सरकार शेतकरीहितार्थ अनेक योजना राबवित असले तरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखा कठोर निर्णय शेतकरी घेत आहे. दिवसेंदिवस शेतकऱ्यांच्या आत्महत्येत वाढ होत आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्यावी, अशी मागणी वेळोवेळी करीत अनेक आंदोलने करण्यात आली. आंदोलनादरम्यान संबंधितांना निवेदनेही देण्यात आली. परंतु या मागणीवर कुठलीही ठोस भूमिका केंद्र आणि राज्य सरकारने घेतली नसल्याचा आरोप करीत शेतकऱ्यांवरील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे, या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी सोमवारी सेवाग्राम आश्रमासमोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे आंदोलन करण्यात आले.शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात सोमवारी करण्यात आलेल्या आंदोलनादरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या संपूर्ण उत्थानासाठी शेतकरी नेते शरद जोशी प्रेणीत भारत उत्थान कार्यक्रम अंमलात आणण्यात यावा, जमीन धारणा कायदा व सिलिंग कायदा, आवश्यक वस्तूंचा कायदा, सक्तीचा जमीन अधिग्रहण कायदा रद्द करण्यात यावा, शेतीसंबंधी बाजार व प्रक्रियेतील सर्व अडथळे काढून शेतमालाला योग्य बाजारभाव मिळण्यातील हस्तक्षेप संपविण्यात यावे, ग्रामीण क्षेत्रासाठी रस्ते, वीज, पाणी साठवणूक आणि प्रक्रिया वाहतूक, विपणन, माहिती तंत्रज्ञान व प्रयोगशाळा आदी आवश्यक संरचना निर्माण करण्यात याव्या, विदेशातून आयात होत असलेल्या शेतमालावर बंदी घालण्यात यावी, शेतकऱ्यांच्या कृषी पंपाला पूर्ण दाबाची २४ तास वीज देण्यात यावी, शेतकऱ्यांवर थकीत असलेले विद्युत देयक तसेच कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे, वाढती बेरोजगारी लक्षात घेता ग्रामीण युवकांसाठी शेती व्यावसायातून रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी शेतीमध्येच भांडवलनिर्मिती होऊ शकेल असे शेती अनुकूल धोरण आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे विविध पक्षातील  राजकीय पुढारी व सत्ताधारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत आंदोलनकर्त्यांनी विविध मागण्यांचे निवेदन सेवाग्राम आश्रमात सादर केले. सदर आदोलनाचे नेतृत्त्व शेतकरी संघटनेच्या माजी आमदार सरोज काशीकर, अनिल घनवट, जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे, माजी खासदार भुपेंद्रसिंग मान, शैलजा देशपांडे, गीता खांदेभराड, सतीश दाणी यांनी केले. आंदोलनात शेकडो महिला व पुरुष शेतकऱ्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.संपूर्ण विदर्भासह महाराष्ट्रातील शेतकरी झाले सहभागीशेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे केंद्र व राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत बापू कुटी समोर शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात सोमवारी शेतकऱ्यांचे महात्म्यांना साकडे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सांगली, सातारा व सोलापूर हे तीन जिल्हे वगळता वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील नागपूर, यवतमाळ, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदीया यासह महाराष्ट्रातील जळगाव, परभणी आदी जिल्ह्यातील शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी भजन करून शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणांचा निषेध करण्यात आला.सरकारला जागविण्यासाठी काढणार रॅलीसरकारला जागविण्यासाठी सेवाग्राम येथून आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे. १ आणि २ रोजी राज्य कार्यकारिणीची बैठक होईल. त्यात जिल्हा पातळीवरील आंदोलनांची घोषणा होईल. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सेवाग्राम ते साबरमती रॅली काढण्यात येणार असल्याचे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी सदर आंदोलनादरम्यान लोकमतशी बोलताना सांगितले.