शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

नागरी कामे त्वरित पूर्ण करा; स्थापत्य समिती अध्यक्षांचे निर्देश

By admin | Updated: April 25, 2016 05:49 IST

महापालिकेच्या स्थापत्य समिती उपनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ विविध विकासकामांचा आढावा घेतला.

मुंबई : महापालिकेच्या स्थापत्य समिती उपनगरचे नवनिर्वाचित अध्यक्ष अनंत (बाळा) नर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर तत्काळ विविध विकासकामांचा आढावा घेतला. शिवाय या संदर्भात एक आढावा बैठकही त्यांच्या दालनात घेतली. या वेळी त्यांनी प्रलंबित नागरी कामे लवकारात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, असे निर्देश संबधित अधिकाऱ्यांना दिले.के (पूर्व) विभागातील उद्यानांचा विकास, साफसफाई यंत्रणा व मुंबई वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियानात मुंबई उपनगरात शौचालय बांधणे, तसेच जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड येथील मलनिस्सारण वाहिनी टाकण्याच्या प्रलंबित कामांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. मुंबई वस्ती स्वच्छता कार्यक्रमांतर्गत मुंबई उपनगरात किती शौचालये बांधण्यात आली, किती शौचालयांचे बांधकाम चालू आहे? याची विचारणा करून चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना बैठकीत अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. लिंक रोड येथील मलनिस्सारण वाहिनी टाकण्यास का विलंब होत आहे?, हे काम लवकरात पूर्ण करण्याची, तसेच प्रस्तावित मलनिस्सारण वाहिन्या लवकरात लवकर पूर्ण करण्यासह, विभागातील नाले पावसाळ्यापूर्वी साफ करून घेण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.