शहरं
Join us  
Trending Stories
1
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
2
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
3
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
4
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
5
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
6
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
7
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
8
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
9
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
10
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
11
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
12
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
13
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
14
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
15
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
16
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
17
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
18
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
19
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
20
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
Daily Top 2Weekly Top 5

‘कॅशलेसचे आश्वासन पूर्ण करा’

By admin | Updated: May 2, 2016 01:00 IST

शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षकांना कॅशलेस विमा देण्याची घोषणा केली

मुंबई : शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ५ सप्टेंबर २०१५ रोजी आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळ्यात शिक्षकांना कॅशलेस विमा देण्याची घोषणा केली होती. मात्र अद्याप ही घोषणा हवेतच असल्याने त्याची तत्काळ पूर्तता करण्याची मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस शिक्षक सेलने केली आहे.शिक्षणमंत्र्यांनी घोषणा करून त्याचे पालन केले नसल्याने शिक्षकांची निराशा झाली असल्याचे मत शिक्षक सेलचे उपाध्यक्ष महादेव सुळे यांनी व्यक्त केले. सुळे म्हणाले की, कॅशलेस योजनेवर साधी चर्चा करण्याचे औदार्यही तावडे यांनी दाखवलेले नाही. त्यामुळे तत्काळ शिक्षकांसाठी कॅशलेस विमा योजना लागू करून शिक्षकांसह शिक्षक कुटुंबाना दिलासा द्यावा. तरी कामगार नेते व आमदार भाई जगताप शिक्षक सेलच्या या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, म्हणून मुख्यमंत्र्यांना आवाहन करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याआधी राज्यातील शिक्षकांची २ लाखांपर्यंतची मेडिकल बिले मंजूर करण्याचा अधिकार जिल्ह्यातील शिक्षणाधिकाऱ्यांना आणि २ लाखांहून अधिक रुपयांची मेडिकल बिले मंजूर करण्याचे अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालक यांना देण्याची मागणी शिक्षक सेलने दोनवेळा प्रशासनाकडे केली होती. ती मान्य करत तसे परिपत्रक शासनाने काढल्याचा दावा सुळे यांनी केला आहे. (प्रतिनिधी)